शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

५वी ते ८वी पर्यंतचे वर्ग तातडीने बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासोबतच होम सर्व्हेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासोबतच होम सर्व्हेच्या चमूंमध्येही वाढ करण्यात यावी, ५वी ते ८वीपर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करण्यात यावेत, महाविद्यालयाचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने पूर्वीसारखे घेण्यात यावेत, नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे, असे शिकवणी वर्ग बंद करण्यात यावेत, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी दिले. महापौरांनी मनपातील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट देऊन कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यावेळी उपस्थित होते.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत नागरिकांना नियमांचे पालन करीत दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, शासन, प्रशासनाने वेळोवेळी इशारा देऊनही दिशानिर्देशांचे पालन होत नाही. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होत असली तरी दंड हा यावरील उपाय नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, यात नगरसेवकांचा सहभाग घेतल्यास प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असे आवाहन महापौरांनी केले. संजय निपाणे यांनी नियंत्रण कक्षामधून केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

....

अधिक रुग्ण असलेल्या भागात सर्वांची चाचणी

व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असल्यास नियमानुसार कारवाई करा, कोरोना नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्या, ज्या परिसरातून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत असतील अशा परिसरात सर्वांची चाचणी करण्यात यावी, आर.आर.टी. चमूंची संख्या वाढवावी, रुग्णांचे समुपदेशन, जनजागृती करण्यात यावी. आशा वर्कर आणि परिचारिकांचीही संख्या वाढविण्याचीही सूचना केली. महापौरांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.