शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाच्या खासगीकरणाचा घाट!

By admin | Updated: February 24, 2016 03:11 IST

स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ही एक राष्ट्रीय चळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच ..

प्रकल्पावर प्रश्नचिन्ह : राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यातगणेश हूड नागपूर स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ही एक राष्ट्रीय चळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच या अभियानातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून या अभियानाच्या खासगीकरणाचा घाट राज्य सरकारने घातला आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार स्वयंसेवी संस्थांवर ही जबाबदारी सोपविल्यास राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे. अभियानात राज्यात तालुका स्तरावर ११५० तर जिल्हा परिषद स्तरावर ४५० कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आहे. राज्यभर हागणदारी मुक्तीची चळवळ उभी करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु नवीन धोरणामुळे यातील निम्मे कर्मचारी घरी बसणार आहेत. पाणी स्वच्छता साहाय्य संस्था व खात्याअंतर्गत कामकाजातील सुसूत्रता व खासगी संस्थांच्या सहभागासंदर्भात चाचपणी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. अभियानातील कर्मचारी गेल्या १२ वर्षांपासून सेवेत आहेत. भविष्यात नोकरीत कायम केले जाईल, या आशेने अनेकांनी खासगी संस्थांतील नोकऱ्या नाकारल्या. परंतु आता त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे. शासनाचे अद्याप निर्देश नाहीस्वच्छ भारत अभियानात सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्यासंदर्भात शासन स्तरावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप शासनाकडून यासंदर्भात कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या विषयावर अधिक माहिती देता येणार नाही. गणेश चौधरी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. अभियानावर प्रश्नचिन्ह स्वच्छ भारत अभियान ही एक राष्ट्रीय चळवळ व्हावी, असे आवाहन सत्ताधारी करीत असतानाच शासकीय यंत्रणेला समांतर असे सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागा घेणार आहेत. त्यामुळे या अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हागणदारी मुक्तीला धक्काराज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी गावागावात लोकचळवळ उभी करण्यात कंत्राटी स्वच्छता दूतांची भूमिका महत्त्वाची आहे. घरात शौचालय उभारण्याची हाक देत पहाटे गावाच्या गोदरीत हातात गुलाबाचे फूल घेऊ न उभे राहून लोकांचे मतपरिवर्तन करण्यातही यांची महत्त्वाची भूमिका आहे. या कर्मचाऱ्यांना कमी केल्यास हागणदारीमुक्त अभियानालाही जबर धक्का बसणार आहे.