शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर जागले मनपाचे स्वच्छता दूत

By admin | Updated: October 24, 2015 03:10 IST

दीक्षाभूमीवर लाखो भाविक आले. विविध संघटनांनी त्यांच्यासाठी नाश्ता, भोजन, पाणी आदीची व्यवस्था केली. तेवढाच कचराही तयार झाला.

दीक्षाभूमी परिसर केला स्वच्छ : २२५ टन कचरा केला गोळानागपूर : दीक्षाभूमीवर लाखो भाविक आले. विविध संघटनांनी त्यांच्यासाठी नाश्ता, भोजन, पाणी आदीची व्यवस्था केली. तेवढाच कचराही तयार झाला. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता दूताची भूमिका बजावत परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. सफाई कर्मचारी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी ६ पर्यंत जागले व सफाई अभियान राबवत संपूर्ण कचरा गोळा करून भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत पोहचविला. यामुळे लाखोंची गर्दी होऊनही दीक्षाभूमी परिसर दुसऱ्या दिवशी स्वच्छ असल्याचे पहायला मिळाले.दीक्षाभूमी व परिसराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी एक कृती आराखडा तयार केला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. सफाईसाठी आरोग्य विभागातील एक हजार कर्मचारी, शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी कनक रिसोर्स मॅनेजमेंटचे २०० कर्मचारी या कामी लावण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनल अधिकारी तैनात होते. दीक्षाभूमी परिसर व दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कचरा टाकण्यासाठी एकूण १५० ड्रम ठेवण्यात आले होते. खाली पडलेला कचरा सफाई कर्मचारी लागलीच उचलून ड्रममध्ये टाकत होते. ड्रममधील कचरा नेण्यासाठी ३५ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर या गाड्या फिरत होत्या. गुरुवारी दिवसभर गोळा झालेला कचरा या गाड्यांनी भांडेवाडे डम्पिंग यार्डमध्ये पोहचविला. गुरुवारी एका दिवसात तब्बल २२५ टन कचरा गोळा करण्यात आला. तर गेल्या चार दिवसात एकूण सुमारे ३०० टन कचरा गोळा करण्यात आला. शुक्रवारी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त नयना गुंडे यांनी यांनी स्वच्छतेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)शौचालयातही दुर्गंध नाहीदीक्षाभूमी परिसरात तात्पुरते ७१० शौचालय उभारण्यात आले होते. या शिवाय ५० सीटची व्यवस्था असलेले मोबाईल टॉयलेटही ठेवण्यात आले होते. या शौचालयाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आला होता. शौचालयांमध्ये सतत फवारणी केली जात आहे की नाही याची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. त्यामुळेच गुरुवारी लाखो अनुयायी येऊनही पसिरात दुर्गंध येत नव्हता. दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हा सर्व कचरा वेळीच उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगारांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुवारी रात्रभर व शुक्रवारीही दिवसभर कचरा उचलण्यात आला. - डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य उपसंचालक, मनपा