शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीरवर दाव्याची पहिली मागणी माझी!

By admin | Updated: August 14, 2016 02:46 IST

पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती.

मणिंदरजीत सिंग बिट्टा : लोकमत भेटीत राजकारण्यांवर डागली तोफ नागपूर : पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे आता जे पंतप्रधान मोदी बोलताहेत ही मागणी मी सर्वांत आधी केली होती. परंतु, त्यावेळी माझ्या मागणीला कुणी गांभिर्याने घेतले नाही. सगळेच राजकीय पक्ष काश्मीरबाबतीत केवळ व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत, असा थेट आरोप अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांनी आज शनिवारी लोकमतला दिलेल्या भेटीत केला. काश्मिरी लोकांच्या सुरक्षेसाठीच तेथे सेनेचे जवान तैनात आहेत. हे विसरून जेव्हा त्या सैनिकांवर दगडफेक होते तेव्हा त्यांनी सुरक्षेसाठी पॅलेट गन चालवली तर यात गैर काय? पण, आपले राजकारणी याचेही राजकारण करीत आहेत. सैनिकांची बाजू न घेता दगडफेक करणाऱ्यांप्रती कळवळा दाखवला जात आहे. राजकारण्यांच्या अशा वागणुकीमुळे सैनिकांचे मनोबल खचत आहे. हे फार धोकादायक आहे, याकडे बिट्टा यांनी लक्ष वेधेले. कलम ३७० हटवा कलम ३७० ने काश्मीरचे खूप नुकसान केले आहे. स्वायत्ततेचा तेथे गैरफायदा घेतला जात आहे. सरकार कोणतेही असो काश्मीरसाठी विशेष पॅकेज देत असते. अशा पॅकेजमुळे त्या राज्यात ऐतखाऊ वृत्ती वाढत आहे. याचा सर्वाधिक गैरफायदा येथील फुटीरवादी संघटना उचलत आहेत. एकीकडे सरकारच्या पॅकेजचा फायदा मिळवायचा आणि दुसरीकडे आयएसआयकडूनही निधी लाटायचा, असा गैरप्रकार काश्मिरात सुरू आहे. केवळ कलम ३७०ने काही होणार नाही. काश्मीर धगधगत ठेवण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. ही समस्या कायमची सोडवायची असेल तर पंतप्रधान मोदींनी नवाज शरीफ यांच्याकडे चहाला जाऊन उपयोेग नाही. हा विषय त्यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेत उपस्थित केला पाहिजे व पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली पाहिजे. माझ्यावर चित्रपट का नाही? उडता पंजाब चित्रपट नुकताच येऊन गेला. यात तर पंजाबचे असे चित्रण होते जणू येथील प्रत्येक घरात गर्दुले राहतात. व्यवसायाच्या दृष्टीने नकारात्मक विषय कॅश करता येतात हे फिल्म निर्मात्यांना चांगले माहीत आहे. म्हणूनच असे अवास्तविक चित्रपट काढले जातात. मी देशाच्या हिताचे बोलतो म्हणून माझ्यावर आतापर्यंत १६ हल्ले झाले. हे कुणा चित्रपट निर्मात्याला का दिसले नाही. बिट्टावर चित्रपट काढावा, असे कुणा निर्मात्याला का वाटले नाही, असा सवालही त्यांनी केला.