शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात चंदन वृक्ष चाेरांची टाेळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST

लाेकमत एक्सक्लुजिव्ह नागपूर : अतिशय गजबजलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरातून ५ चंदनाची झाडे चाेरीला गेल्याचे प्रकरण ...

लाेकमत एक्सक्लुजिव्ह

नागपूर : अतिशय गजबजलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरातून ५ चंदनाची झाडे चाेरीला गेल्याचे प्रकरण गुरुवारी उघड झाले. धक्कादायक म्हणजे मेडिकलच्या लसीकरण केंद्राच्या बाजूला असलेली ही झाडे एक दिवसा आधीच ताेडून नेल्याचा संशय आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या काही महिन्यांत शहरात अनेक ठिकाणांहून चंदनाची माेठमाेठी झाडे चाेरीला गेल्याची प्रकरणे घडली आहे. काेट्यवधींचा वनसंपदा चाेरीला जात असताना यंत्रणा मात्र झाेपा काढत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मेडिकल परिसरात दरराेज सकाळी फिरणाऱ्या पर्यावरणप्रेमींना चंदनाची झाडे ताेडलेली दिसली. मेडिकलचे अधिष्ठातांच्या बंगल्याचा हा परिसर असून, येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या भागातून एक दाेन नव्हे, तर पाच झाडे ताेडून नेली आहेत. ही झाडे मंगळवारी रात्री चाेरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत मेडिकल प्रशासनाला विचारले असता तेही या चाेरीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समजले. मेडिकलच्या परिसरातून लाखाेंची वनसंपदा चाेरीला जात असताना प्रशासनाला काहीच माहिती, ही बाब समजण्याच्या पलीकडे आहे. मेडिकल परिसरातील घटना असल्याने साहजिकच महापालिका व वनविभागाला साेयरसुतक नसेल यात शंकाच नाही व त्यांचे उत्तरही तसेच हाेते.

उल्लेखनीय म्हणजे शहरात चंदनाची झाडे चाेरी जाण्याची ही पहिली घटना नाही. वेगवेगळ्या ठिकाणाहून संथगतीने चंदनाची झाडे चाेरीला जात आहेत आणि महापालिका, वनविभाग या यंत्रणा पूर्णपणे गाफील असल्याचेच दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांतील चंदनचाेरीच्या घटना

सर्वात आधी रवीनगर चाैकातील एक माेठे चंदनाचे झाडे ताेडून नेण्यात आले हाेते. गेल्या वर्षी महाराजबागेतूनच अज्ञात चाेरट्यांनी काही चंदनाची झाडे ताेडून नेली. त्यानंतर व्हीआयपीराेडवरील कृषी महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊसमधील झाडे चाेरीला गेले. महापालिकेच्या मुख्यालयातूनही चंदनाची दाेन झाडे अचानक गायब झाली. यासाेबतच नागपूर पाेलीस दलातील डीसीपी हसन यांच्या बंगल्यातील चंदनाचे झाडे चाेरी गेले. सिव्हिल लाइन्स परिसरात आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये ही महागडी झाडे असून, चाेरट्यांची नजर त्यावर तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

कुठे जातात ही झाडे

चंदनाचे लाकूड अतिशय महाग आहे. तज्ज्ञांच्या मते एका झाडाचे खाेड विकले, तर लाखाेंचा फायदा हाेताे. त्यामुळे चंदन चाेरांची टाेळी सक्रिय असण्याची दाट शक्यता आहे. मात्र हे खाेड कुठे विकले जाते, याचा पत्ता लावण्याची गरज आहे.

शहरात चंदन वृक्षाची चाेरी सातत्याने हाेत आहे. यंत्रणा गाफील असल्याने ही टाेळी माेठ्या शांतपणे काम करीत आहे. त्यामुळे पाेलीस व वनविभागाने सामूहिकपणे प्रयत्न करून, खाेलात जाऊन तस्करीचा छडा लावण्याची गरज आहे. चाेरांच्या टाेळीवर कठाेर कारवाई करून कायमचा बंदाेबस्त लावण्याची गरज आहे.

- श्रीकांत देशपांडे, पर्यावरण कार्यकर्ता