शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एंडिंगच्या वसुलीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : वर्षभराच्या जमाखर्चाचा ताळेबंद तयार करून नफा-ताेटा तपासला जाताे. यासाठी सर्वच शासकीय, खासगी बँका तसेच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : वर्षभराच्या जमाखर्चाचा ताळेबंद तयार करून नफा-ताेटा तपासला जाताे. यासाठी सर्वच शासकीय, खासगी बँका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आपली थकबाकी मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत वसूल करतात. परंतु कोरोनामुळे विस्कटलेली घडी अजूनही रूळावर आली नसताना ‘मार्च एंडिंग’च्या वसुलीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

मार्च २०२० पासून तीन महिने कोरोनामुळे संपूर्ण देश थांबला होता. या कालावधीत अनेकांचे उद्योग-व्यवसाय, नोकऱ्या गेल्या. या काळात अनेकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आपल्याजवळील जमापुंजी खर्च केली. कसाबसा संसाराचा गाडा हाकण्यासाठी परिश्रम घेतले. या कालावधीत नेहमीचा खर्च करणे अनिवार्य होताच. परंतु हा खर्च करताना उत्पन्न मात्र शून्य होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत गेला तसतसा लाॅकडाऊनवरील निर्बंध कमी करण्यात आल्याने अनेकांचे उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले. परंतु आजही बाजारात पाहिजे तसे व्यवहार होताना दिसत नाहीत. अनेकांची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्णत: पूर्वपदावर आली नसतानाच आता मार्च एंडिंगच्या वसुलीने त्यांना त्रस्त करून सोडले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये मोफत तांदूळाशिवाय नागरिकांना शासनाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही. नागरिकांनी स्वकष्टाने घरगुती आर्थिक बजेट सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मार्च एंडिंगच्या वसुलीमुळे मात्र तो पुरता मेटाकुटीस आला आहे. मार्चपर्यंत होणारा जमाखर्चाच्या हिशेबाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

....

थकीत हप्ते भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून?

ग्रामपंचायत कर, नगर परिषद कर, वीज वितरण कंपनीचे वीजबिल, खासगी शाळांची फी, सहकारी क्षेत्रातील कर्ज, शासकीय बँकांचे कर्ज, नगर परिषद गाळ्यांचा तसेच ग्रामपंचायत गाळ्यांंचा किराया आदींची धडाक्यात वसुली करण्यात येत आहे. वीज बिल भरले नाही, तर वीज जोडणी कापण्याचा सपाटा वीज वितरण कंपनी सुरू करणार, तर बँकांच्या कर्जाचे हप्ते वेळेत भरण्यात आले, नाही तर नोटीस येण्याचा धाक, शाळांची फी भरली नाही, तर पाल्यांच्या शिक्षणाचे काय होणार, याबाबत होणारी चिंता आदी कारणांमुळे नागरिक हैराण झाला आहे. मार्च एंडिंगपर्यंत स्वतःकडील थकीत हप्ते भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून, या विवंचनेत सध्या नागरिक सापडला आहे.