शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी मांडली मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणी

By admin | Updated: August 22, 2015 03:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असले की ते सामान्य नागरिकांना हमखास भेटतात आणि त्यांच्या गाऱ्हाणी ऐकून घेतात.

हैदराबाद हाऊस : तीन तासात हजार निवेदने नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असले की ते सामान्य नागरिकांना हमखास भेटतात आणि त्यांच्या गाऱ्हाणी ऐकून घेतात. रविवारचा दिवस त्यांनी खास नागरिकांसाठी राखून ठेवला आहे. परंतु शुक्रवारी ते नागपूर दौऱ्यावर असतांना देखील त्यांनी नागरिकांच्या भेटी घेत निवेदने स्वीकारली. हैदराबाद हाऊस येथे लोकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. मुख्यमंत्र्यांनी तीन तासात हजारावर निवेदने स्वीकारली. विविध विकास प्रकल्पांच्या संदर्भातील प्रश्नांसोबतच पुनर्वसन, पावरलूम उद्योगाशी संबंधित विणकरांनी या उद्योगाला मदत करावी, विविध शाळेतील शिक्षकांचे प्रश्न, अपंगांनी आपल्या मागण्या सोडविण्यासोबतच चार चाकी गाडीच्या मागणीसाठी, मालकी हक्काचे पट्टे, कळमेश्वर येथील नागरिकांनी गावाला रस्ता बांधण्यासाठी, बंद पडलेल्या महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन मिळण्यासाठी, जीवनदायी आरोग्य योजने संदर्भात तसेच हृदयरुग्णांच्या मदतीसाठी ग्रामीण भागाचे महिलांच्या बचत गटासंदर्भातील तर गडचिरोली येथे औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी भूखंड, धनगर, हलबा, कोष्टी आदी समाजाच्या प्रश्नांसदर्भात अशा विविध मागण्यांची निवेदने मुख्यमंत्र्यांना व्यक्तीश: भेटून देण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये पौष्टिक आहार पुरविण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाते ती एक वर्षाची करावी यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी भेटून आपले निवेदन सादर केले. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुलासह एक महिला मुख्यमंत्र्यांना भेटली असता शिक्षण पूर्ण करण्यासाठी सवलत असल्याचे सांगून मुलांना शिकवून मोठे करा, आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात वस्तुस्थिती सांगितली पण त्यासोबतच मदत करण्याबाबत आश्वस्तही केले. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेवटच्या नागरिकांचे निवेदन स्वीकारल्यानंतरच दुसऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री रवाना झाले.(प्रतिनिधी) ‘जलयुक्त शिवार’साठी पाच हजाराचा धनादेश हैदराबाद हाऊस येथे जनतेची निवेदने स्वीकारत असताना मानकापूर येथील हिना कैसर खान तसेच रिट्स ओरा या दोन मैत्रिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार अभियानाला मदत करण्याच्या आवाहनानुसार पाच हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सादर केला. यावेळी सय्यद अमजद अली हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते.