शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: May 8, 2016 03:11 IST

मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सायकलला कट मारला आणि आठ वर्षीय बालक टिप्परच्या चाकाखाली आला.

टिप्परने बालकास चिरडले : संतप्त नागरिकांनी जाळले आठ टिप्परसह एक टँकरमनसर : मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सायकलला कट मारला आणि आठ वर्षीय बालक टिप्परच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील बोर्डा (सराखा) येथे या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आठ टिप्पर व एक टँकर अशी एकूण नऊ वाहनांची जाळपोळ केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी बोर्डा येथील १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दुसरीकडे, अपघाताच कारणीभूत ठरलेला टिप्पर जप्त करण्यात आला असून, टिप्परचालकास अटक करण्यात आली.मनीष पंढरी देवगडे (८, रा. पांढुर्णा) असे मृत बालकाचे नाव आहे. तो बोर्डा येथील मारोतराव धारणे यांच्याकडे लग्नासाठी आला होता. तो किराणा दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी जात असताना भरधाव टिप्परने त्याच्या सायकलला कट मारला आणि तो चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिडलेल्या बोर्डावासीयांनी घटनास्थळी एक आणि गावापासून काही अंतरावर पाच, खाणीजवळ तीन अशा आठ टिप्पर व एका टँकरची जाळपोळ केली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी हंसराज वंजारी, रा. कामठी यांच्या तक्रारीवरून नागरिकांविरुद्ध भादंवि ४३७, १४३, १३५ अन्वये गुन्हे दाखल केले असून, कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. या जाळपोळीमध्ये अंदाजे १ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दुसरीकडे, अपघातास कारणीभूत ठरलेला एमएच-४०/एन-६४३५ क्रमांकाचा टिप्पर जप्त करण्यात आला असून, टिप्परचालक दत्तात्रय किशन गुडे (३५, रा. कामठी) यास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मनीषच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पांढुर्णा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीष हा मोठा असून, त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. ओरिएन्टल कंपनीचे कर्मचारी तसेच त्यांच्याकडे किरायाने असलेल्या वाहनांचे चालक परिसरात मनमानी करीत असल्याने नागरिकांत त्यांचविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासन हा असंतोष विचारात घेतला नाही. आ. डी. एम. रेड्डी, माजी आ. आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी राम जोशी यांनी शनिवारी दुपारी बोर्डा गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. मृत मनीषच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)