शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना ‘आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेराेना संक्रमित आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ आणि रॅपिड ॲन्टिजन’ यापैकी एक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : काेराेना संक्रमित आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ आणि रॅपिड ॲन्टिजन’ यापैकी एक टेस्ट करावी लागते. यातील ‘आरटीपीसीआर टेस्ट’चा रिपाेर्ट येण्यास विलंब हाेत असल्याने तसेच टेस्ट केलेले नागरिक रिपाेर्ट येईपर्यंत मनसाेक्त फिरत असल्याने त्यांचे फिरणे धाेकादायक ठरू शकते. कळमेश्वर शहरासह तालुक्यातील काेराेना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता ‘आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट’ शक्य तितक्या लवकर देणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.

कळमेश्वर शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची झपाट्याने वाढ हाेत आहे. दर चार घराआड एक रुग्ण आढळून येत असल्याने तालुक्यात राेज किमान १०० ते १५० रुग्णांची अलीकडच्या काळात नाेंद केली जात आहे. शहरात ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील काेविड केअर सेंटरमध्ये ‘आरटीपीसीआर टेस्ट’ची साेय करण्यात आली आहे. या दाेन्ही ठिकाणचे सर्व नमुने तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमधील प्रयाेगशाळेत पाठविले जातात.

पूर्वी आरटीपीसीआर टेस्टचे रिपाेर्ट दाेन दिवसांत प्राप्त व्हायचे. अलीकडच्या काळात या रिपाेर्टला विलंब का हाेताे, हेही कळायला मार्ग नाही. रिपाेर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्ती विलगीकरणातही राहत नाही. प्रशासनाची दिरंगाई आणि नागरिकांचा बेफिकीरपणा काेराेना संक्रमणाच्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याच्या प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या असून, नागरिकांनी संक्रमण वाढू नये म्हणून स्वत:साेबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. काेराेना रुग्णांची वाढती संख्या आणि शासकीय रुग्णालयातील खाटांची कमतरतेमुळे परिस्थिती गंभीर रूप धारण करीत असल्याने प्रत्येकाने जबाबदारी वागणे व काळजी घेणे गरजेचे आहे, असेही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

...

आठवडाभरानंतरही रिपाेर्ट नाही

शहरातील काही नागरिकांनी त्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट ४ एप्रिल राेजी केल्या. त्यांचे रिपाेर्ट अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. ही टेस्ट करणाऱ्यांमध्ये एखाद दुसरी व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह असल्यास तसेच रिपाेर्टअभावी ती व्यक्ती कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येत असल्याने ती व्यक्ती काेराेना ‘स्प्रेडर’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, रिपाेर्ट येण्यापूर्वी काेणत्याही रुग्णावर उपचाराला सुरुवात केली जात नाही. रिपाेर्ट येण्यास विलंब हाेत असल्याने या काळात वाढलेली संक्रमणाची तीव्रता त्या व्यक्तीसाठी जीवघेणी ठरू शकते, असेही काहींनी सांगितले.

...

आरटीपीसीआर टेस्टसाठी घेतलेले स्वॅब तपासणीसाठी आम्ही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविताे. तिथे संपूर्ण जिल्हाभरातील स्वॅब नमुने तपासणीसाठी येत असल्याने तंत्रज्ञांवर कामाचा ताण वाढताे. मध्येच काही तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे रिपाेर्ट येण्यास विलंब हाेताे. रिपाेर्ट येण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करताे. आम्हाला सध्या ३ व ९ एप्रिल राेजी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर टेस्टचे रिपाेर्ट प्राप्त झाले आहेत. संबंधितांना फाेन करून व मॅसेजद्वारे त्याची माहिती दिली आहे.

- डाॅ. प्रीती इंगळे, अधीक्षक,

ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.