अचानक भेटीमुळ अधिकाऱ्यांची तारांबळ : तासभर केली पाहणीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक कारागृहात भेट दिली. तब्बल तासभर कारागृहाची पाहाणी करतानाच फडणवीस यांनी ‘जेल ब्रेक’ चा स्पॉट बघितला आणि विविध बराकींसह अंडासेलचीही पाहाणी केली. ‘जेल ब्रेक’ च्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची बारीक सारीक माहिती प्रशासनाकडून घेतली. विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री नागपुरात आले.विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी सरळ मध्यवर्ती कारागृहात चलण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा काफिला सकाळी ७.३० च्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर धडकला.
मुख्यमंत्री धडकले कारागृहात
By admin | Updated: April 21, 2015 01:59 IST