शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रंगांचा केमिकल लोचा

By admin | Updated: March 13, 2017 01:56 IST

रसायनयुक्त रंग आरोग्यासाठी घातक असल्यामुळे इको फ्रेण्डली रंग वापरण्याचे आवाहन केले जाते.

हर्बल रंग नावापुरतेच : जनजागृतीचा परिणाम शून्य नागपूर : रसायनयुक्त रंग आरोग्यासाठी घातक असल्यामुळे इको फ्रेण्डली रंग वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, त्यानंतरही पैसे वाचविण्यासाठी तसेच आपला रंग घट्ट व्हावा या नादात रसायनयुक्त रंगच खरेदी केले जात असल्याचे निदर्शनास आले. रंगांचा हा केमिकल लोचा शरीरासाठी महागात पडू शकतो, याचा अनेकांना विसर पडल्याचे दिसून आले. शहरातील काही रस्त्यांवर, चौकात रंग विक्रीची दुकाने सजली होती. १० रुपये ते ३० रुपयांपर्यंत रंगाची एक डबी विकल्या जात होती. खुल्या रंगांनाही अधिक मागणी होती. या दुकानांमध्ये लोकमत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता इको फ्रेण्डली रंग वापरण्याबाबत सर्व माहिती असूनही तो खरेदी करण्याची मानसिकता मोजक्याच नागरिकांमध्ये दिसून आली. २५ पैकी एखाददुसरी व्यक्ती इको फे्रण्डली रंगांबाबत विचारत होती. मात्र, इको फ्रेण्डली रंग नाही म्हटल्यावर कुणीही माघारी फिरत नव्हते. आहे तो रंग खरेदी करण्यात धन्यता मानत होते. दोन प्रकारच्या गुलालांची विक्री होताना दिसली. एका गुलालाचा दर प्रती किलो ४५ ते ५० रुपये होता. तर दुसऱ्या गुलालाचा दर ६५ ते ७० रुपये किलो होता. गुलालाचे असे वेगवेगळे दर का अशी विचारणा केली असता एक हलक्या प्रतीचा व दुसरा उच्च प्रतीचा असल्याचे दुकानदाराने स्पष्ट केले. घरी वापरायचा असेल तर उचा घ्या, बाहेर खेळायचा असेल तर हलका घ्या, असा सल्लाही दुकानदार देत होता. जास्तीत जास्त लोक पैसे वाचविण्यासाठी हलका गुलाल खरेदी करताना दिसले. काही उच्चशिक्षित लोक रंग खरेदी करण्याऐवजी उच्चप्रतीचा गुलाल खरेदी करताना दिसले. मात्र, अशांची संख्या कमी होती.