शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

धान्य विक्रीचे ‘चेक बाऊन्स’

By admin | Updated: April 17, 2017 02:14 IST

नोटाबंदीच्या काळात स्थानिक व परिसरातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य व्यापाऱ्याला विकले.

व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह महादुला (रामटेक) : नोटाबंदीच्या काळात स्थानिक व परिसरातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य व्यापाऱ्याला विकले. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी ‘चेक’ दिले. शेतकऱ्यांनी सदर ‘चेक’ त्यांच्या बँकखात्यात जमा केले असता, ते ‘बाऊन्स’ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. रामटेक पोलिसांनी ‘त्या’ व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी त्याला अटक केली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात मुद्दाम दिरंगाई करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रफुल्ल धापले, रा. रामटेक असे व्यापाऱ्याचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून रामटेक, मौदा व पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचा व्यवसाय करतो. त्याने नोटाबंदीच्या काळाला रामटेक तालुक्यातील महादुला, पंचाळा, मौदा तालुक्यातील मौदा, निमखेडा, पारडी (कला), चाचेर, तारसा, रेवराळ येथील काही शेतकऱ्यांकडून धानासह अन्य धानाची खरेदी केली. व्यापाऱ्याकडे पुरेसी रोख रक्कम नसल्याने त्याने या शेतकऱ्यांना आठ दिवस ते तीन महिने मुदतीचे (पोस्ट डेटेड) ‘चेक’ दिले. शेतकऱ्यांनी सदर ‘चेक’ त्यांच्या बँक खात्यात जमा केले. नियोजित काळात चेक न वटल्याने अनेकांनी बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, ‘चेक बाऊन्स’ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती लगेच व्यापाऱ्याला दिली. परंतु, त्याने त्याच्या बँक खात्यात पुरेशा रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी व्यापाऱ्याविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. परंतु, त्याला अद्यापही अटक करण्यात न आल्याने तसेच तपासात दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांनी रामटेक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासनाने व्यापाऱ्यास अटक करावी तसेच धान्य विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी भागवत काठोके, सुरेश काठोके, माणिक मोहने, जितेंद्र मोहने, भारत तरारे, सुनील काठोके, इंद्रपाल मोहने, सुनील बरबटे, गुणवंत सोनवणे, देवचंद काठोके, नरेश काठोके यांनी केली आहे. (वार्ताहर)