शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक

By admin | Updated: January 2, 2017 02:34 IST

बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची जमीन विकण्याचा डाव थोडक्यात हुकला.

जमीन दुसरीचीच : भलतीच महिला बनली मालकीण नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची जमीन विकण्याचा डाव थोडक्यात हुकला. जमिनीचा सौदा करणाऱ्याने मूळ जमीन मालकिणीशी संपर्क साधल्याने त्रिकुटाची बनवाबनवी उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी या त्रिकुटावर गुन्हाही दाखल केला. गोधनी, झिंगाबाई टाकळी येथे राहणाऱ्या हिना जयराम कोल्हे यांची लाखो रुपये किमतीची जमीन आहे. आरोपी चंदशेखर धर्मदास बाळबुधे (रा. नंदनवन गल्ली नंबर ३), रतन वामन उके (वय २१, रा. वकीलपेठ, रेशीमबाग) आणि पवन दौलत ठाकरे (वय ३४, रा. नंदनवन) या तिघांनी ही जमीन हडपण्यासाठी कट रचला. त्यासाठी एका महिलेचीही साथ घेतली. आरोपींनी साथीदार महिलेचे बनावट मतदार ओळखपत्र तयार केले. त्या ओळखपत्राच्या आधारे साथीदार महिलेला अधिकाऱ्यांसमोर हजर केले. हीच महिला हिना जयराम कोल्हे असल्याचे सांगून, आरोपींनी ८ डिसेंबर २०१५ च्या सायंकाळी सिव्हिल लाईनमधील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात आपल्या नावाने जमिनीचे आममुख्त्यारपत्र तयार केले. त्यानंतर ही जमीन विकण्याचे आरोपींनी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, सौदा करणाऱ्या व्यक्तीने कोल्हे यांच्याशी थेट संपर्क साधला तेव्हा ही बनवाबनवी उघड झाली. त्यानंतर कोल्हे यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)