शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्वेदी घरून शिवसेनेचा कारभार चालवितात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड ...

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. शेवटी तक्रारींची दखल घेत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी बुधवारी दोन्ही गटाची आमोरासमोर बैठक घेतली. या बैठकीतही नाराज गटाने चतुर्वेदी यांच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली. ते पक्ष कार्यालयाऐवजी घरूनच चालवित असल्याची तक्रार केली. याची दखल घेत देसाई यांनी पक्ष कार्यालयातूनच कारभार करण्याच्या सूचना चतुर्वेदी यांना दिल्या. तसेच नाराज गटालाही पक्षविरोधी भूमिका न घेण्याची ताकीद देण्यात आली.

माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याची गंभीर दखल मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. ही संधी साधत माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, माजी महापौर किशोर कुमेरिया, माजी शहर प्रमुख सुरज गोजे, राजू कनोजिया, जगतराम सिन्हा, बालू मगरे यांनी अनिल देसाई यांच्याकडे चतुर्वेदींच्या कारभाराबाबत तक्रार केली. देसाई यांनी असंतुष्टांना बुधवारी मुंबईत बोलावून घेतले. देसाई यांच्याकडून निरोप मिळताच दुष्यंत चतुर्वेदी हे देखील महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कासपे, मंगला गवरे आदींना घेऊन पोहोचले. खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत देसाई यांनी या सर्वांची बैठक घेतली.

बैठकीत किशोर कुमेरिया, कनोजिया, गोजे यांनी शिवसेनेची बैठक पक्ष कार्यालयात न घेता चतुर्वेदी यांच्या घरी होत असल्याची तक्रार केली. आता काँग्रेसच्या घरातून शिवसेना चालवायची का, असा सवाल त्यांनी केला. शहर कार्यकारिणीत तसेच जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवर

काँग्रेसमधून आलेल्यांना स्थान देण्यात आले असून, जुने पदाधकारी, माजी नगरसेवक यांना संधीच देण्यात आली नसल्याचेही सांगितले. असे सुरू राहिले तर नागपुरात शिवसेनेला गळती लागेल, असा धोका त्यांनी वर्तविला. कनोजिया यांनी तर नितीन तिवारी यांच्यावर वसुलीचे आरोप केले. दिवाकर रावते ज्यांना पक्षातून काढणार होते, त्यांना चतुर्वेदी यांनी शहर प्रमुख बनविले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तिवारी यांनी आरोप फेटाळत चतुर्वेदी यांची बाजू भक्कमपणे मांडली. भाजपच्या घोटाळ्यांविरोधात आपण आंदोलने करून आवाज उठविल्याचेही त्यांनी सांगितले. कुमेरिया, हरडे यांनी शहरात दोन महानगर प्रमुख करण्याची मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर देसाई यांनी नाराज गटालादेखील पक्षाचे नुकसान होईल, अशी भूमिका घेऊ नका, असे बजावले.