शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करुन कुख्यात साखळीचोराच्या आवळल्या मुसक्या

By admin | Updated: March 14, 2017 15:38 IST

मध्य प्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर सोनू याचा चक्क तीन किलोमीटर पाठलाग करून एका पोलीस शिपायाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 14 - शस्त्राच्या धाकावर लुटमार करून पळून जाणारा मध्य प्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर सोनू उर्फ प्रितपालसिंग जसवंतसिंग कलसी (वय ४०) याचा चक्क तीन किलोमीटर पाठलाग करून एका पोलीस शिपायाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. किशोर धोटे असे या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-याचे नाव असून, तो सदर पोलीस ठाण्यात शिपायी म्हणून सेवारत आहे.
केंद्रीय बांधकाम विभागाच्या सिव्हील लाईनमधील बंगल्यात राहणा-या अश्विनी पुरुषोत्तम पाततावणे (वय २७) त्यांच्या बहिणीसोबत सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सदरमधून जात होत्या. अश्विनी मागे बसल्या होत्या तर त्यांची बहिणी दुचाकी चालवित होती. पागलखाना चौकाजवळ अचानक मागून मोटरसायलवर आलेल्या कुख्यात सोनू कलसीने चाकूसारख्या टोकदार शस्त्राने जखम करून अश्विनी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून घेण्याचा प्रयत्न केला. नोकदार शस्त्राची जखम झाल्यामुळे अश्विनी ओरडल्या. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले पोलीस शिपायी किशोर धोटे यांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी तिकडे धाव घेताच आरोपी सोनू कलसी धोकादायक पद्धतीने वाहनचालवून पळू लागला. धोटे यांनी त्याचा तीन किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि आरोपी सोनू कलसीच्या मुसक्या आवळल्या.  अश्विनी पानतावणे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
 
शिपायी धोटेंचा सत्कार
कुख्यात सोनू कलसी हा मध्यप्रदेशातील जोहारटोली (होशंगाबाद) येथील संजयनगरातील रहिवासी आहे. तो सोनसाखळी चोर म्हणून कुख्यात आहे. विविध शहरात  मोटरसायकलने सावज हेरून तो साखळी चोरतो आणि पळून जातो. अनेक राज्यातील पोलिसांना तो हवा आहे. त्याच्याविरुद्ध एकट्या नागपूर शहरात विविध पोलीस ठाण्यात ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गुन्हा केल्यानंतर त्याचा लगेच पाठलाग करून त्याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावणारे पोलीस शिपायी धोटे यांचे धाडस आणि कर्तबगारी माहित पडताच सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी धोटेंना 2 हजार रुपयांचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अन्य अधिका-यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे.