शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एकाच हाताने ओढतोय संसाराचा रथ

By admin | Updated: May 8, 2017 02:42 IST

प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहतात. वेगळा तोच ठरतो जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचे धाडस करतो.

अपंगत्वावर मात : अखंड संघर्षातही मुलांना देतोय उच्च शिक्षण दयानंद पाईकराव । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहतात. वेगळा तोच ठरतो जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचे धाडस करतो. संघर्षमय आयुष्यातही रोजचे जगणे सुंदर करणारे ललेंद्र कराडे यांची साहसकथाही अशीच आहे. जन्मजात एका हाताने अपंग असूनही आपल्या हिमतीच्या भरवशावर ते केवळ कुटुंबाचा रथ ओढतच नाहीत तर मुलांनाही उच्च शिक्षण देत आहेत. केवळ परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून जगण्याची लढाई अर्धवट सोडू पाहणाऱ्या अनेकांसाठी ललेंद्र कराडे एक आशादायी आदर्श आहेत. जरीपटक्याच्या हुडको कॉलनीत राहणारा ललेंद्र श्रीराम कराडे हे कुणाचीही मदत न घेता एकाच हाताच्या भरवशावर भाजीविक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. ते जन्मापासून उजव्या हाताने अपंग आहेत. परंतु त्यांच्या मनातील जिद्द आकाशाला गवसणी घालणारी आहे. एका हाताने अपंग असला तरी आपल्या अपंगत्वाचा त्याने बाऊ केला नाही अन् कुणासमोर हातही पसरला नाही. उपजीविका भागविण्यासाठी त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपण पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मनात आल्यानंतर त्याने लग्नाचा विचार करून लग्न केले. त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगा आणि एक मुलगी अशी फुले उमलली. भाजी विक्रीतून ललेंद्र संसाराचा रथ ओढत असताना दिवसेंदिवस त्याची मुलेही लहानाची मोठी होत होती. ती शाळेत जाऊ लागली. महागाईच्या युगात शिक्षण महाग झाले असताना ललेंद्रने आपल्या मुलांना शिक्षणात कुठेही काही कमी पडू दिले नाही. आज त्याची मुलगी बीए दुसऱ्या वर्गाला तर मुलगा बीएच्या पहिल्या वर्गाला शिकत आहे. एकाच हाताने ठेला चालवून त्याला भाजी विकताना पाहिले की अनेक जण नवल करून त्याच्या जिद्दीचे कौतुक करतात. त्याची ही जिद्द इतर अपंग व्यक्तींना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. सकाळीच जातात कॉटन मार्केटला ललेंद्र भल्या पहाटे उठून भाजीपाला खरेदी करण्यासाठी कॉटन मार्केटला जातात. तेथून भाजी खरेदी केली की सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते भाजी विकतात अन् सायंकाळी घरी परततात. उन्हाळा असो, पावसाळा की कडाक्याची थंडी ललेंद्रच्या दिनचर्येत आजवर कोणताच फरक पडला नाही.