शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण विषयाची परीक्षा अडचणीत

By admin | Updated: February 9, 2016 03:03 IST

सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात सक्तीचा केला आहे. परंतु शिक्षण विभागाने त्याला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते आहे.

इतर शिक्षकांवर भार : शिक्षण विभागाला गांभीर्यच नाहीनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात सक्तीचा केला आहे. परंतु शिक्षण विभागाने त्याला गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते आहे. कारण दरवर्षी पर्यावरण विषयाची मूल्यमापन पद्धती बदलते आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी बारावीच्या मौखिक परीक्षा बाह्य परीक्षकांद्वारे घेण्याचे ठरविले आहे. बहुतांश शाळेत पर्यावरण विषयासाठी स्वतंत्र शिक्षक नाही. त्यामुळ मौखिक परीक्षेसाठी बोर्डाने इतर विषयाच्या शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना २० गुण विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. पर्यावरणाचे ज्ञानच नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी संभ्रमात असून शिक्षकही अडचणीत आले आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सध्या एचएससी बोर्ड मार्च २०१६ मध्ये होऊ घातलेल्या तोंडी व प्रात्याक्षिक परीक्षा सुरू आहे. यात पर्यावरण विषयाची चांगलीच गोची झाली आहे. दरवर्षी पर्यावरणाच्या मूल्यमापनाची पद्धत बदलत आहे. गेल्यावर्षी विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षकांना परीक्षा घेऊन गुण देण्याचा अधिकार होता. यावर्षी विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा बाह्य शिक्षकांकडून घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. मंडळाचा निर्णय योग्य असला तरी, पर्यावरण विषयातील शिक्षकच उपलब्ध नसल्याने इतर विषयांच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागत आहे. सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत पर्यावरण विषयात उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. परंतु ७० टक्के महाविद्यालयांमध्ये हा विषय शिकवायला शिक्षकच नाही. वर्कलोड कमी असलेल्या शिक्षकाला पर्यावरण विषय शिकवावा लागत आहे. मंडळाने सर्वच विषयाच्या २० गुणांच्या मौखिक परीक्षा सक्तीच्या केल्या आहे. ज्या महाविद्यालयात इतर विषयाच्या शिक्षकावर पर्यावरणाचा भार आहे. अशा शिक्षकांना स्वत:च्या विषयाच्या परीक्षा, पर्यावरण विषयाच्या परीक्षेचे नियोजन आणि बाहेरच्या शाळेत जाऊन परीक्षा घेण्याची कसरत करावी लागत आहे. या परीक्षेसाठी वेळही अतिशय कमी असल्याने, शिक्षक अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना परीक्षेचे मूल्यमापन कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महाविद्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. (प्रतिनिधी)