शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षांना परमिट नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान

By admin | Updated: August 17, 2015 02:56 IST

नवीन परमिट नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध नीलेश लोखंडे यांच्यासह ३७ आॅटोरिक्षाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

हायकोर्टात याचिका : राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीसनागपूर : नवीन परमिट नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध नीलेश लोखंडे यांच्यासह ३७ आॅटोरिक्षाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाचे मुख्य सचिव, परिवहन आयुक्त, नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.याचिकाकर्त्या आॅटोरिक्षाचालकांनी परमिट मिळविण्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेत सहभाग घेतला होता. जाहिरातीनुसार परमिटसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. दहावी उत्तीर्ण अर्जदार पुरेशा संख्येत न मिळाल्यास इयत्ता आठवी उत्तीर्ण अर्जदारांचा विचार करण्यात येणार होता. याचिकाकर्ते इयत्ता आठवी उत्तीर्ण असल्यामुळे त्यांना पात्र ठरवून यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर इयत्ता दहावी उत्तीर्ण नसल्याच्या कारणाने त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. २६ नोव्हेंबर १९९७ रोजी राज्य शासनाने मोटर वाहन कायदा-१९८८ मधील कलम ७४(३)अंतर्गत आदेश जारी करून आॅटोरिक्षांना नवीन परमिट देणे थांबविले आहे. त्यावेळी राज्यात १२ हजार ३६० वैध परमिट होते. ३१ मार्च २०१५ रोजी नागपूर शहरात ९२५५ परमिट होते. यापैकी ३१०५ परमिटची मुदत संपली होती. यामुळे राज्य शासनाने १ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या निर्णयानुसार नागपूर शहरात १५५२ नवीन परमिट (रद्द झालेल्या परमिटच्या ५० टक्के) जारी करण्याची परवानगी दिली. २०१४ मध्ये ११७० नवीन परमिट जारी करण्यात आले. ३८२ परमिट अद्याप बाकी आहेत. यासाठी दावा विचारात घ्यावा, अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे.याचिकाकर्त्यांनी नवीन परमिट जारी करण्यावर असलेल्या बंदीलाही आव्हान दिले आहे. शासनाने ३० जानेवारी २००८ रोजी ठरविलेल्या गुणोत्तरानुसार एक लाख लोकसंख्येमागे ८०० आॅटोरिक्षा परमिट आवश्यक आहे. नागपूर शहरातील ३१ डिसेंबर २०११ पर्यंतच्या २४ लाख लोकसंख्येनुसार ९९८९ नवीन परमिट जारी करणे प्रस्तावित आहे. सध्या नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांवर असल्यामुळे ३२ हजार परमिटची गरज आहे. त्यानुसार शहरात २२ हजार नवीन परमिट जारी करणे गरजेचे आहे, असा हिशेब याचिकाकर्त्यांनी स्पष्ट करून वादग्रस्त आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)