शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील विद्यापीठे ‘आययूएमएस’अंतर्गत येणे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:16 IST

राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘डिजिटल’ प्रणाली लागू होणार कशी? वेगळ्या कार्यप्रणाली व आराखड्याचे गणित कसे जमणार?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम) ही प्रणाली लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची कार्यप्रणाली वेगवेगळी आहे. अशा स्थितीत कार्यप्रणाली व आराखड्याचे एकाच मापदंडानुसार गणित बसविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. ही एकीकृत ‘डिजिटल’ प्रणाली कशी काय लागू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कामामध्ये सुुसूत्रता यावी यासाठी मागील वर्षी ‘आययूएमएस’ प्रणालीसंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवेश, परीक्षा, निकाल इत्यादीसंदर्भातील विविध समस्यांवर ‘एन्ड टू एन्ड’ तोडगा मिळेल, असा दावादेखील करण्यात आला. ‘आययूएमएस’अंतर्गत माहिती व तंत्रज्ञान संचालनालय व ‘महाआयटी’तर्फे विविध ‘मॉड्युल्स’ विकसित करण्यात आली. यात प्रवेश,‘अ‍ॅकेडेमिक्स’, महाविद्यालये, मनुष्यबळ व्यवस्थापन व प्रशासन यांच्याशी निगडित ‘मॉड्युल्स’ यांचा समावेश आहे. याअंतर्गत गुणवत्तेच्या आधारावरील प्रवेश, जागा वाटप, नोंदणी प्रक्रिया, वसतिगृह नोंदणी, हजेरी, शुल्क, अभ्यासक्रम तयार करणे, अ‍ॅकेडेमिक कॅलेंडर, परीक्षा व्यवस्थापन, संशोधन व्यवस्थापन, महाविद्यालयांची संलग्नता, महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे, ‘ई-सर्व्हिस बुक’, महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षक, कंत्राटी शिक्षक व प्राचार्यांची भरती, पदोन्नती, वित्त व लेखा, ई-निविदा, विधी प्रकरणे, पेरोल, पीएफ, पेन्शन इत्यादीबाबत ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन्स’ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्रत्येक विद्यापीठाचे ‘अ‍ॅकेडेमिक कॅलेंडर’ वेगवेगळे असते. काही विद्यापीठांमध्ये संलग्नित महाविद्यालयांची संख्या कमी आहे. तर नागपूर विद्यापीठासारख्या विद्यापीठात ही संख्या साडेपाचशेहून अधिक आहे. अनेक महाविद्यालयांकडून तर नेमका ‘डाटा’देखील दिलेल्या मुदतीत देण्यात येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यापीठातील परीक्षा व्यवस्थापन, निकालांची पद्धत, मूल्यांकनाची प्रक्रिया वेगवेगळी आहे. मग सर्वांना समान प्रणाली लागू करणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. अशा स्थितीत ‘आययूएमएस’ राबविणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाविद्यालयांची डोकेदुखी वाढणार?दरम्यान, या सॉफ्टवेअरमध्ये संलग्नित महाविद्यालयांचीदेखील इत्थंभूत माहिती असेल. अनेक महाविद्यालयांमध्ये तर नियमांनुसार नियमित शिक्षकांचादेखील अभाव आहे, तर बऱ्याच ठिकाणी प्राचार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून विद्यापीठांनाच माहिती देण्यात चालढकल करण्यात येते. त्यांच्याकडून ‘आययूएमएस’ प्रणालीला विरोध आहे. याशिवाय सर्व ‘डाटा’ अपलोड करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ