शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

दोनदा ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरलेली ‘आप’ कुणाचा वाढविणार ताप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 07:00 IST

Nagpur News आता नागपूर मनपा निवडणुकीसाठी उत्साहात असलेले ‘आप’चे कार्यकर्ते कुणाचा ताप वाढवतात की पुन्हा तिसऱ्यांदा तोंडघशी पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे मनपाच्या निवडणुकीत पहिल्यांदा आजमविणार जोर

कमलेश वानखेडे

नागपूर : दिल्ली गाजवणारी आम आदमी पार्टी यावेळी नागपूर महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहे. ‘आप’ने २०१४ मध्ये नागपूर लोकसभेत लक्षणीय मते घेत लक्ष वेधले होते. मात्र, नंतरची पाच वर्षे संघटन बांधणी करूनही २०१९ मध्ये विधानसभेच्या ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरले. त्यामुळे आता मनपा निवडणुकीसाठी उत्साहात असलेले ‘आप’चे कार्यकर्ते कुणाचा ताप वाढवतात की पुन्हा तिसऱ्यांदा तोंडघशी पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर देशभरात त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याच काळात भ्रष्टाचाराविरोधात पक्षाने लढा तीव्र केला होता. अशात ‘आप’ने २०१४ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी दिली. दमानिया आक्रमकपणे लढल्या. त्यांना नागपूरकर मतदारांची अनपेक्षित साथही मिळाली. त्यावेळी नवखा पक्ष असताना, नागपुरात पहिल्यांदाच निवडणूक लढवित असतानाही दमानिया यांना तब्बल ६९ हजार ८१ मते मिळाली. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा हजार व अधिक मते मिळाली. पश्चिम नागपुरात १३ हजार ७६ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपुरात तब्बल १४ हजार ३१३ मते मिळाली. मतांची ही आकडेवारी राजकीय पक्षांना धडकी भरविणारीच होती. यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे उमेदवार रिंगणात उतरले नाही. मात्र, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अन्यथा नोटाचा वापर करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभेच्यावेळी जोशात असलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

२०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीतही आप प्रत्यक्ष मैदानात उतरली नाही. यावेळीही तीच भूमिका कायम ठेवली. पक्षाकडून त्यावेळीही कुणाला एकाला पाठिंबा दिला गेला नाही. त्यामुळे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते विखुरले व मनाला पटेल त्याचे काम करताना दिसले. यानंतर २०१९ मध्ये ‘आप’ने महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविलीच नाही. यामुळे संघटन बांधणीत जुंपलेल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात ‘पब्लिक टेस्ट’ घेता आली नाही. २०१९ मध्ये राज्यात विधानसभेच्या २५ जागा लढविल्या. यात नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम व ग्रामीणमधील रामटेक मतदारसंघाचा समावेश होता. पाच वर्षांच्या पक्षबांधणीनंतरही ‘आप’च्या उमेदवारांना दखलमात्र मते घेता आली नाहीत. अंजली दमानिया यांना दक्षिण-पश्चिम नागपुरात १४ मते ३१३ मिळाली होती. मात्र, २०१९ मध्ये याच मतदारसंघात अमोल हाडके यांना जेमतेम १,१२५ (०.५९ टक्के) मते मिळाली. तर रामटेकमधून लढलेले इश्वर गजबे यांना फक्त ८३४ मते (०.४५ टक्के) मिळाली. दुसऱ्याचा ताप वाढविण्यासाठी रिंगणात उतरलेली ‘आप’ स्वत:च तोंडघशी पडली.

‘आप‘चा राजकीय आलेख

२०१४ मध्ये नागपूर लोकसभेत अंजली दमानिया लढल्या.

२०१४ ची विधानसभा लढले नाही.

२०१७ नागपूर महापालिका लढले नाही.

२०१९ : महाराष्ट्रात लोकसभा लढले नाही.

२०१९ : राज्यात विधानसभेच्या २५ जागा लढले. नागपुरात दक्षिण-पश्चिम व रामटेक या दोन जागा लढल्या.

२०२२ : महापालिका निवडणूक लढणार

टॅग्स :AAPआप