शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘चक्का चोर’ सापडले

By admin | Updated: November 26, 2015 03:25 IST

उपराजधानीत चक्काचोरांची टोळी सक्रिय झाली असून उभ्या वाहनाचे अख्खे चाकच चोरटे काढून नेत आहेत.

अंबाझरी पोलिसांची कारवाई : दोघांना अटकनागपूर : उपराजधानीत चक्काचोरांची टोळी सक्रिय झाली असून उभ्या वाहनाचे अख्खे चाकच चोरटे काढून नेत आहेत. असेच दोन चक्काचोर अंबाझरी पोलिसांच्या हाती लागले आहेत. ओंकार धनराज सूर्यवंशी (२२) रा. सुदामनगरी आणि विजय मुन्ना मिश्रा (२१) रा. अंबाझरी टेकडी असे या चक्का चोरांचे नाव आहे. मंगळवारी रात्री गस्तीवरील पोलिसांना आरोपी संदिग्ध अवस्थेत फिरताना सापडले. त्यांना पोलिसांनी थांबवून विचारपूस केली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यांनी टायर चोरल्याची कबुली दिली. पवनी भंडारा येथील समीक्षा नागुलकर (२०) या विद्यार्थिनीने कॅटच्या परीक्षेसाठी नागपुरात शिकवणी वर्ग लावला आहे. यासाठी ती अंबाझरी येथील श्रीकृष्णा अपार्टंमेटमध्ये भाड्याने राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या अपार्टमेंट बाहेर पार्क केलेल्या गाडीतील चाक चोरट्यांनी काढून नेले. यासंदर्भात तिने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी गस्तीदरम्यान पोलिसांना हे दोघेही अंबाझरी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होते. ते चक्का चोरीच्या प्रयत्नातच होते. शहरात चक्का चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. यासंदर्भात लोकमतने बुधवारच्याच अंकात वृत्त प्रकाशित करून पोलिसांचे लक्षही वेधले आहे. लकडगंज परिसरात राहणाऱ्या मल्लिका लांजे या महिलेच्या ह्युंडई आय १० या कारचे टायर ट्युबसह अख्खे चाकच चोरीला गेले. सोमवारी रात्री ही घटना घडली. त्याचप्रकारे शांतिनगर येथील गुलाबचंद सुराणा यांच्या ह्युंडई आय २० ग्रॅण्ड कारची तीन चाके चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चक्का चोरीसह कारचे लोगो सुद्धा चोरीला जात आहे. अंबाझरीच्या घटनेमुळे ही बाब स्पष्ट झाली असून या चोरट्यांकडून या टोळीतील इतर सदस्यांचीही माहिती पुढे येऊ शकते.(प्रतिनिधी)