शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नक्षलवादावर केंद्राचे लक्ष केंद्रित

By admin | Updated: May 14, 2015 02:37 IST

छत्तीगडमधील दंतेवाडा येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलींना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन

नागपूर : छत्तीगडमधील दंतेवाडा येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलींना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर आता केंद्राने विदर्भातील नक्षल चळवळीवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे गुरुवारी नागपुरात येत आहेत. ते विदर्भातील ‘अ‍ॅन्टी नक्सल आॅपरेशन’चा आढावा घेणार आहेत. रेशीमबाग येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष सभेलादेखील ते उपस्थित राहणार आहेत. राजनाथसिंग यांचे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता दिल्ली येथून बीएसएफच्या विशेष विमानाने नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते रेशीमबाग येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष सभेला उपस्थित राहतील. यानंतर रविभवन येथे विदर्भातील ‘अ‍ॅन्टी नक्सल आॅपरेशन’च्या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विदर्भात आजवर झालेले नक्षली हल्ले, पोलिसांनी केलेल्या कारवाया यासह नक्षलवाद रोखण्यासाठी राबवायच्या ‘अ‍ॅक्शन प्लान’वर चर्चा होणार आहे. दंतेवाडा येथे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी जगदलपूर येथे रेल्वेचा रूळ उखडून टाकला होता, तर ५०० गावकऱ्यांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. या घटनाक्रमानंतर लगेच गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडून विदर्भात नक्षल आढावा बैठक घेतली जात असल्याने सुरक्षा यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. (प्रतिनिधी)