शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही

By admin | Updated: March 14, 2015 02:35 IST

दलित बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीची सुरक्षा व्हावी, यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

नागपूर : दलित बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीची सुरक्षा व्हावी, यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. १६ मार्चला होत असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजना म्हणून या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा मूळ प्रस्ताव हा ६२.१५ लाखांचा होता. या प्रकल्पासाठी ५० लाख जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार आहे. तितकाच निधी यावर खर्च केला जाणार आहे. त्यानंतर निधी प्राप्त झाला तरच उर्वरित काम पूर्ण केले जाणार असल्याची चर्चा आहे. दीक्षाभूमीचा मुद्दा भावनिक असल्याने स्थायी समितीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर होण्याची अपेक्षा असल्याने मे. टेक्नोकी सोल्युशन्स कॅमेरे लावण्याच्या तयारीत आहे. मनपाच्या गांधी कन्या शाळेच्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. यावर २.५८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. प्रशासनाचाही या संकुलासाठी आग्रह आहे. विवेकानंदनगर व गांधीसागर तलावाजवळ उभारण्यात आलेले क्रीडा संकूल याचेच एक प्रतीक आहे. या प्रकल्पावर सुरुवातीला १.७६ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. (प्रतिनिधी)संविधान चौकाचे सौंदर्यीकरणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विचारात घेता संविधान चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी शुक्रवारी चौकाला भेट देऊ न कामाचा आढावा घेतला. या परिसरातील बंद पडलेला सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा, मूर्तीचा परिसर स्वच्छ करून रंगरंगोटीचे काम १४ एप्रिलपूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सुनील अग्रवाल, शरद बांते, उद्यान अधीक्षक नरेशचंद्र श्रीखंडे आदि उपस्थित होते.