शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयच्या आकस्मिक धाडी आणि तपासण्या

By admin | Updated: December 30, 2014 00:51 IST

महालेखाकार (एजी) कार्यालय परिसरातील बांधकामाचे प्रकरण प्रदीर्घ गाजले. विविध शासकीय कार्यालयाच्या कारभाराची जो विभाग अंकेक्षण (आॅडिट) करतो. त्याच विभागाच्या इमारत बांधकामाच्या

नागपूर : महालेखाकार (एजी) कार्यालय परिसरातील बांधकामाचे प्रकरण प्रदीर्घ गाजले. विविध शासकीय कार्यालयाच्या कारभाराची जो विभाग अंकेक्षण (आॅडिट) करतो. त्याच विभागाच्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी सीपीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या हितासाठी गैरप्रकार अवलंबल्याचा आरोप होता. येथील निकृष्ट बांधकामाची संयुक्तपणे तपासणी करून सीबीआयने नमूने गोळा (जप्त) केले. संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. १५ वर्षांपासून समाधानकारक प्रदर्शन नसूनही सुरू असलेल्या चांडक अ‍ॅन्ड सन्स या पेट्रोल पंपावर एचपीच्या अधिकाऱ्यांसह सीबीआयने संयुक्तपणे तपासणी आणि परीक्षण केले. ओरिएन्टल इंशोरन्स कंपनी लिमिटेडच्या काही अधिकाऱ्यांवर ‘क्लेम सेटलमेंट‘मध्ये संशयास्पद भूमिका वठविल्याचा आरोप होता. शिवाय हिंदी आणि इंग्रजी टंकलेखकांच्या निवड प्रक्रियेतही गैरप्रकार झाल्याची तक्रार मिळाल्यामुळे सीबीआयने ओरिएन्टलच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आकस्मिक तपासणी करून महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले होते. त्याचप्रमाणे शंकास्पद खरेदी प्रक्रिया आणि नोंदी करून वादग्रस्त ठरलेल्या भारत संचार लिमिटेडच्या काही अधिकाऱ्यांकडे खात्यातीलच वरिष्ठांसोबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी करून या प्रकरणाची चौकशी केली. (प्रतिनिधी)सैन्यदलाला हादरवणारी परीक्षाआॅल इंडिया आर्मी रिक्रूटमेंट एन्ट्रन्स टेस्ट नागपूर केंद्रावर सुरू होती. परीक्षेचा पेपर फुटल्याची तसेच पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली जात असल्याची तक्रार अधीक्षक संदीप तामगाडगे यांना अगदी काही तासांपूर्वी कळली. त्यांनी लगेच वेगवेगळ्या चमू परीक्षा केंद्रांवर पाठवल्या. अनेक संशयितांची चौकशी करून सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टँगो चार्ली सेना, सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक जयकुमार बेलखोडे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. सैन्य दलाच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या संपूर्ण गैरप्रकाराची माहिती सीबीआयकडून घेतली होती. -