शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जेईई मेन (संयुक्त प्रवेश) परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील पाच बड्या शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जेईई मेन (संयुक्त प्रवेश) परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील पाच बड्या शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकाने धडक दिली. गेल्या २४ तासांत या पाचही ठिकाणी बारीकसारीक तपासणी करण्यात आली. स्थानिक युनिटमधील सहकाऱ्यांच्या मदतीने सीबीआय, दिल्लीच्या पथकाने मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केल्याची माहिती आहे.

देशातील विविध ठिकाणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जेईईचा कथित गडबडघोटाळा चर्चेला आला आहे. या गैरप्रकारात नागपुरातील काही जेईई कोचिंग संस्था तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने काही जणांविरुद्ध जेईई मेन्स परीक्षा २०२१ मध्ये झालेल्या अनियमिततेसंबंधाने प्रकरण नोंदवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेईई मेन्सच्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार करून अनेक विद्यार्थ्यांकडून तगडी रक्कम घेऊन शीर्षस्थ एनआयटीत (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रवेश देण्यासंबंधी खटाटोप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सीबीआयकडून गेल्या आठवडाभरापासून देशातील विविध भागात छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली, एनसीआर, पुणे, जमशेदपूर, इंदोर आणि बंगलुरूसह अन्य काही ठिकाणी छापेमारी झाली, तर गेल्या २४ तासात दिल्लीचे सीबीआयचे पथक नागपुरात धडकले. त्यांनी स्थानिक सीबीआय युनिटच्या सदस्यांना सोबत घेऊन नागपुरातील नंदनवन, गणेशनगर, आझमशहा चाैकातील काही कोचिंग क्लासेसमध्ये प्रदीर्घ तपासणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या संबंधाने अधिकृत माहिती मात्र सीबीआय अधिकाऱ्यांकडून मिळू शकली नाही.

----