शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-माैदा-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील वडाेदा (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-माैदा-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील वडाेदा (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, २६ गुरांची सुटका करीत एकूण २७ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

आबिद शमीन अख्तर (२७, रा. विणकर काॅलनी, कामठी) व नसिम खान इस्माईल खान (३२, रा.सैलाब नगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमएच-२०/डीई-७६१७ क्रमांकाचा ट्रक माैदाहून कामठीच्या दिशेने जाताना दिसला. संशय आल्याने पाेलिसांनी हा ट्रक वडाेदा शिवारात अडविला आणि झडती घेतली. त्या ट्रकमध्ये २६ जनावरे काेंबली असल्याचे दिसून येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली.

ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ट्रकमधील सर्व जनावरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी ट्रकमधील दाेघांना अटक केली आणि त्यांच्याकडून २५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि २ लाख ६० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण २७ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक ठाकूर करीत आहेत.