शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीचे टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर शहरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी आणि ओव्हरलाेड वाहतूक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर शहरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी आणि ओव्हरलाेड वाहतूक करणारे तीन टिप्पर पकडले. यात तिन्ही टिप्परच्या चालकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १ काेटी ५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २७) सकाळी करण्यात आली.

दिनेश विलास बिलवणे (२४, रा. भंडारा), गौतम तुकाराम राजक (४०, रा. मध्य प्रदेश) व दुष्यंत संपतलाल सलामे (३२, रा. पाचगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपी टिप्परचालकांची नावे आहेत. रेतीच्या विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष माेहीम सुरू केली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिवापूर परिसरात गस्तीवर असताना त्यांना शहरातून एमएच-४०/‌सीडी-६४७५, एमएच-४०/बीएल-३८९५ व एक विना क्रमांकाचा असे तीन टिप्पर येताना दिसले.

पथकाने तिन्ही टिप्पर थांबवून झडती घेतली असता, त्या रेती आढळून आली. ती रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी तिन्ही टिप्परच्या चालकांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून एक काेटी ५ लाख रुपये किमतीचे तीन टिप्पर आणि ९५ हजार रुपयांचर १९ ग्रास रेती असा एकूण १ काेटी ५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश भोयर, संतोष पंधरे, मदन आसतकर, राधेश्याम कांबळे, बालाजी साखरे, भाऊराव खंडाते यांच्या पथकाने केली.