शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीसह दाेन टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : महसूल विभागाच्या पथकाने कन्हान नदीकाठच्या चिरव्हा (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये अवैध उपसा केलेली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : महसूल विभागाच्या पथकाने कन्हान नदीकाठच्या चिरव्हा (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये अवैध उपसा केलेली रेती भरण्यासाठी वापरली जात असलेली जेसीबी मशीन आणि वाहतूक करणाऱ्या दाेन टिप्परसह सहा ब्रास रेती ताब्यात घेतली. ही कारवाई शनिवारी (दि. १३) रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ही सर्व वाहने माैदा तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.

रेती चाेरट्यांनी कन्हान नदीवरील चिरव्हा ते वढना दरम्यान नवीन घाट तयार करून तिथून काही दिवसापासून रेतीचा अवैध उपसा सुरू केला. हा रेतीसाठा चिरव्हा शिवारातील पांडुरंग निंबार्ते, रा. चिरव्हा यांच्या शेतात ठेवण्यात आल्याची माहिती काहींनी महसूल विभागाला दिली. त्यामुळे महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री या घाटाची तसेच पांडुरंग निंबार्ते यांच्या शेताची पाहणी केली.

त्यांना त्या शेतात आरएजे-३-डीएक्सएसएसएच-०२८३८४१३ क्रमांकाच्या जेसीबीद्वारे एमएच-४०/वाय-०७९७ व एमएच-३६/एफ-२९९५ क्रमांकाच्या टिप्परमध्ये रेती भरली जात असल्याचे निदर्शनास आले. चाैकशीअंती ताे रेतीसाठा विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने जेसीबीसह दाेन्ही टिप्पर आणि त्यातील प्रत्येकी तीन ब्रास रेती लगेच ताब्यात घेत सर्व वाहने रेतीसह तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केली.

पथकाला पाहताच जेसीबी व टिप्परचालक पळून गेले. त्यामुळे कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. ती जेसीबी महेश खापेकर, रा. चिरव्हा व दाेन्ही टिप्पर हटवार, रा. कापसी, ता. माैदा यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. या प्रकरणात नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.

...

रेतीतस्करांच्या हस्तकाची अरेरावी

महसूल विभागाच्या पथकाने गेल्या २० दिवसात केलेली ही तिसरी माेठी कारवाई हाेय. पहिल्या कारवाईमध्ये एक जेसीबी, दुसऱ्या कारवाईमध्ये एक जेसीबी व दोन टिप्पर आणि तिसऱ्या कारवाईमध्ये एक जेसीबी व दोन टिप्पर महसूल विभागाने पकडले. ही कारवाई टाळण्यासाठी तसेच वाहने साेडण्यासाठी रेती तस्कराच्या एका हस्तकाने तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यासाेबत अरेरावी केली तसेच राजकीय दबावाचा वापर केला, अशी माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्याने दिली. त्यामुळे ऐनवेळी पाेलिसांची मदत घेतल्याचेही त्या कर्मचाऱ्याने सांगितले.