लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : पाेलिसांच्या पथकाने सावळी फाटा (ता. सावनेर) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात चालकास अटक करण्यात आली असून, वाहनातील सात जनावरांची सुटका करण्यात आली. शिवाय, ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ३) सकाळी करण्यात आली.
केळवद परिसरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच केळवद पाेलिसांच्या पथकाने सावळी फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यातच एमएच-१४/डीएम-९४२३ क्रमांकाच्या वाहनचालकाने पाेलिसांना पाहताच वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर वाहन पकडले आणि झडती घेतली. त्या वाहनात पाच बैल व दाेन कालवडी अशी सात जनावरे काेंबली असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे नागपूर परिसरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक नाैशाद रफिक शेख (३१, रा. सावळी, ता. सावनेर) यास अटक केली.
या कारवाईमध्ये तीन लाख रुपयांचे वाहन, ४० हजार रुपये किमतीचे पाच बैल व १४ हजार रुपये किमतीच्या दाेन कालवडी असा एकूण ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. माेहम्मद फैजान कुरेशी व माेहम्मद जमील अब्दुल रकीम, दाेघेही रा. नागपूर हे आराेपी पसार असल्याची तसेच वाहनातील गुरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रकरणी केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड, शिपाई धाेंडूतात्या देवकत्ते, सचिन येळकर, गुणवंता डाखाेळे यांच्या पथकाने केली.