शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

कॅशलेश व्यवहार आर्थिक प्रगतीचा टप्पा

By admin | Updated: January 15, 2017 02:15 IST

कॅशलेश’ व्यवहार हा आर्थिक प्रगतीचा टप्पा आहे. यामुळे प्रत्येकाने कॅशलेस व्यवहार करावा,

अपूर्व मिश्रा : कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा नागपूर : ‘कॅशलेश’ व्यवहार हा आर्थिक प्रगतीचा टप्पा आहे. यामुळे प्रत्येकाने कॅशलेस व्यवहार करावा, असे आवाहन एस बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अपूर्व मिश्रा यांनी केले. वरिष्ठ कोषागार कार्यालय व एस बँक यांच्या संयुक्त विद्यामाने बचत भवन येथे आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. यावेळी सहसंचालक विजय कोल्हे, वरिष्ठ कोषागार अधिकारी मोना ठाकूर, अप्पर कोषागार अधिकारी दीपाली राऊत, उपकोषागार किशोर कोढे, लेखाधिकारी शैलेश कोठे, सायबर क्राईम शाखेचे पोलीस निरीक्षक उमाकांत एस. अदके, बँक उपप्रबंधक समीर कुळकर्णी, आदित्य व्यास आदी उपस्थित होते. अपूर्व मिश्रा मार्गदर्शन करताना म्हणाले की, कॅशलेश व्यवहार बँक कार्ड, प्रिपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करू शकता. तसेच आधार कार्ड नंबर व बँक खाते नंबर बँकेशी लिंक केल्यास लाभार्थ्यांना सबसिडी सहज मिळू शकते. विविध वॉलेट्सच्या माध्यमातून आॅनलाईन खरेदी करता येते. सर्व कॅशलेस व्यवहार करताना बँकेकडे आपला मोबाईल नंबर अचूक असणे गरजेचे आहे. प्रिपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा पिन कोड नंबर कुणालाही देऊ नये तसेच डेबिट व क्रेडिट कार्डचा २५ हजार रुपयांपर्यंतचा विमाही काढता येतो. तो प्रत्येकाने काढावा, असे आवाहन त्यांनी केले. ही संपूर्ण माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून देण्यात आली. सायबर क्राईम शाखेचे पोलीस निरीक्षक उमाकांत अदके म्हणाले की, कॅशलेस व्यवहार हा सर्वसामान्य नागरिकांकरिता सुलभ आहे. परंतु व्यवहार करताना दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या प्रिपेड, डेबिट आणि क्रेडिट कार्डचा उपयोग व्यवहार करण्याकरिता दुसऱ्याला करू देऊ नये. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये, एटीएममधून पैसे काढताना दक्षता बाळगा व मोबाईलमध्ये आॅनलाईन शॉपिंग करण्याकरिता डाऊनलोड केलेल्या ‘अ‍ॅप’विषयी खात्री करून घ्या, असे ते म्हणाले. कार्यशाळेचे संचालनव आभार प्रदर्शन एस. एस. चहांदे यांनी केले. यशस्वितेकरिता संजय बुलबुले, नीलेश बोनगिरवार, प्रियंका पाठे, प्रणय भोगे, जितेंद्र ठाकूर व कोषागार व एस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)