शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या विक्रीचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उजेडात - सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सक्करदऱ्यातील तरुणीच्या विक्रीचे ...

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उजेडात - सक्करदरा पोलिसांकडे तक्रार

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सक्करदऱ्यातील तरुणीच्या विक्रीचे खळबळजनक प्रकरण ‘लोकमत’ने बुधवारी उजेडात आणल्यानंतर समाजमाध्यमावर ते चांगलेच चर्चेला आले आहे. दरम्यान, महिला-मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचे नेटवर्क नागपूर-महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातही असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट झाले आहे.

या टोळीच्या आमिषाला बळी पडल्यामुळे पोटच्या मुलीचे जीवन उद्ध्व‌स्त होण्याच्या मार्गावर असल्याचे कल्पना यांना लक्षात आले. तशात आरोपी महिलांनी राजकोटवरून परतताना धावत्या रेल्वेतून फेकून देण्याची धमकी आणि ५० हजारात इंदूरला विकण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे हादरलेल्या कल्पना कशाबशा नागपुरात पोहचल्या. त्यांनी पती आणि मुलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पती व मुलासह त्या राजकोटकडे निघाल्या. तेथे घोडाजी गावात सीमाला ज्यांनी विकत घेतले होते त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे आरोपींनी सीमाला त्यांच्या हवाली केले. त्यानंतर सीमा तिच्या कुटुंबीयांसोबत नागपुरात पोहचली. नऊ महिन्यात दोनदा विकली गेल्याने आणि दोन्हीकडून शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या गेल्यामुळे सीमाला जबर मानसिक धक्का बसला आहे. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या ॲड. भारती तामगाडगे, हेमा धुर्वे, कल्याणी शिंदे आणि प्रीती कापसे यांच्या कानावर जाताच त्यांनी या कुटुंबाला मानसिक आधार दिला. त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---

आंतरराज्यीय रॅकेट हाती लागण्याची शक्यता

सीमाची नऊ महिन्यात दोनदा विक्री करून साडेतीन लाख रुपये हडपणाऱ्या आरोपी महिला बिनधास्त शहरात वावरत आहेत. त्यांनी त्यापूर्वी आणि सीमाच्या विक्रीनंतरही अनेक तरुणी तसेच महिलांची विक्री केल्याचा संशय आहे. अहमदाबाद, राजकोट, इंदूर अशा वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात या टोळीचे नेटवर्क असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले असून पोलिसांनी या टोळीची कसून चाैकशी केल्यास महिला-मुली विकणारे एक आंतरराज्यीय रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

----