शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रासिटी’च्या प्रकरणांत निर्दोषांचे प्रमाण अधिक

By admin | Updated: February 25, 2016 02:57 IST

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार करणे किंवा सामाजिक प्रतिष्ठेला अवमान करण्याबाबत ‘अ‍ॅट्रासिटी’चा गुन्हा दाखल करण्यात येतो.

विदर्भात पाच वर्षात हजारांहून अधिक गुन्हे दाखल : शिक्षेचे प्रमाण केवळ साडेपाच टक्केनागपूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार करणे किंवा सामाजिक प्रतिष्ठेला अवमान करण्याबाबत ‘अ‍ॅट्रासिटी’चा गुन्हा दाखल करण्यात येतो. विदर्भात ‘अ‍ॅट्रासिटी’च्या अंतर्गत पाच वर्षात जवळपास पावणे अकराशे गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये शिक्षा होणाऱ्यांपेक्षा निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात पोलीस विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. विदर्भात ‘अ‍ॅट्रासिटी’चे किती गुन्हे नोंदविण्यात आले, किती प्रकरणे न्यायालयात गेली, किती जणांना शिक्षा झाली व किती जण निर्दोष सुटले याबाबत त्यांनी माहिती विचारली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०११ ते जानेवारी २०१६ या कालावधीत विदर्भात ‘अ‍ॅट्रासिटी’चे १ हजार ८२ गुन्हे नोंदविण्यात आले. यापैकी ९८८ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. एकूण प्रकरणांमध्ये निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण हे सुमारे ६२ टक्के इतके आहे. तर केवळ साडेपाच टक्के म्हणजे ५५ प्रकरणांत शिक्षा झाली. (प्रतिनिधी)प्रकरणांमध्ये होतेय वाढसर्वाधिक २८२ गुन्हे नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल २६७ गुन्हे चंद्रपूर जिल्ह्यात नोंदविण्यात आले. सर्वाधिक कमी म्हणजे ७३ गुन्हे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. एकट्या नागपूर शहरात १४४ गुन्ह्यांची नोंद झाली. गेल्या ५ वर्षांच्या आकडेवारीकडे लक्ष टाकले तर २०१२ पासून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २०१५ साली सर्वाधिक २६० गुन्ह्यांची नोंद झाली. २०१२ च्या तुलनेत २०१५ साली ‘अ‍ॅट्रासिटी’च्या गुन्ह्यांमध्ये ६८ टक्क्यांनी वाढ झाली. त्या तुलनेत न्यायालयात मात्र प्रकरणे जात नसल्याची बाब समोर आली आहे.