शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये

अविनाश धर्माधिकारी : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरनागपूर : इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमासंदर्भात रुची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करीत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करिअर धोक्यात राहील. त्यामळे विद्यार्थ्याने सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन त्यादृष्टिकोनातून करिअरची निवड करावी, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकमत युवा नेक्स्ट, भारतीय विद्या प्रसारक संस्था व झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन भारत कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वक्ता व मार्गदर्शक म्हणून अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांने स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. आपली योग्यता व आवडीच्या करिअरची निवड केल्यास १०० टक्के यशाची खात्री आहे. दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्या दिवशी झुलेलाल इन्स्टिट्यूटचे चेअरमन महेश साधवानी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक जे. एम. अभ्यंकर, विशेष अतिथी म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार अनिल सोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी यांनी केले. संचालन वंदना बळवाईक, आभार प्रदर्शन प्राचार्य वीणा खोतपाल यांनी केले.कार्यक्रमाला किरण गडकरी, जीवन गोडे, मनोज वखरे, एम. प्रधान, हारोडे, दुबे उपस्थित होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे, डब्ल्यू. जी. चोरघडे, के. डी. पत्तरकिने, ए. के. मोने, पी.आर. लिमसे, पी. के. चिंचघरे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नकानॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) चे प्रा. योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की केवळ परीक्षेसाठी अभ्यास करू नका. विद्यार्थीदशेत अवगत केलेले ज्ञान जीवनाभर कामी येईल, असा अभ्यास करा. असे करिअर निवडा की ज्यातून आपल्याला आनंद मिळेल. शिबिराचा समारोप गणिताचे शिक्षक किरण गडकरी यांच्या भाषणाने झाला. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक झुलेलाल इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य देवाशिष भौमिक यांनी केले.