शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविणार उमेदवार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

नागपूर : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीवर थेट भाष्य करणे टाळले. मात्र महापालिकेच्या येत्या ...

नागपूर : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीवर थेट भाष्य करणे टाळले. मात्र महापालिकेच्या येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरविले जातील, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना इशारा दिला. सोबतच कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे, असा संकल्प सोडत कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले. महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दक्षिण-पश्चिम, दक्षिण व पश्चिम नागपूर अशा तीन मतदारंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. तीत प्रदेश कार्याध्यक्ष व विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. ॲड. अभिजित वंजारी, प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण आदी उपस्थित होते. बैठकीत पटोले यांनी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. बुथ स्तरापर्यंत संपर्क वाढवा, महागाईच्या प्रश्नावर जनतेत जावून जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

नितीन राऊत अनुपस्थित, खदखद कायम

- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलाविलेल्या या तीनही बैठकीला पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसने या बैठकांबाबत जारी केलेल्या पत्रकात राऊत हे उपस्थित राहतील, असे नमूद आहे. मात्र, राऊत यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत खदखद शमलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीतूनच मनपा आयुक्तांना फोन

- दक्षिण-पश्चिमचा आढावा सुरू असताना कार्यकर्त्यांनी लसीकरण केंद्रांवर भाजपचे झेंडे लावले असल्याची माहिती दिली. याची दखल घेत पटोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना फोन करून यासंदर्भात तक्रार केली.

काँग्रेसचाच महापौर : ठाकरे

- वॉर्ड पद्धतीच्या निवडणुकीत काँग्रेसला नेहमीच चांगले यश मिळाले आहे. शहर काँग्रेसने बूथ पातळीपर्यंत संघटन बांधणी केली असून विविध आघाड्या व सेलची पुनर्रचना करण्यात आली आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचा महापौर झालेला दिसेल, असा दावा शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केला.