शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये ‘सर्जरी कॅन्सर केअर’!

By admin | Updated: August 15, 2015 02:59 IST

देशातील कॅन्सरपीडित रु ग्णांची संख्या पाहता २० राज्यांमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ४९ ‘सर्जरी कॅन्सर केअर’

४५ कोटींची प्रतीक्षा : केंद्र शासनाची योजना नागपूर : देशातील कॅन्सरपीडित रु ग्णांची संख्या पाहता २० राज्यांमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ४९ ‘सर्जरी कॅन्सर केअर’ निर्मिती करण्यासंबंधी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने २०१३ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार महाराष्ट्रात मुंबईच्या केईएम रुग्णालयाला कॅन्सर इन्स्टिट्यूट तर नागपूरच्या मेडिकल आणि साताराच्या जिल्हा रुग्णालयाला ‘सर्जरी कॅन्सर केअर’ होणार होते. परंतु नंतर केंद्रात सत्ताबदल झाल्याने ही योजना लागू होणार की बारगळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आता मेडिकलमध्ये ‘सर्जरी कॅन्सर केअर’चा मार्ग मोकळा झाला असून टीबी वॉर्डाच्या परिसरात यासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव तयार केला जात आहे.देशात ३० लाख लोकसंख्येमागे एक तर महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे एक रेडिओथेरेपी युनिट अस्तित्त्वात आहे. निकषानुसार दर ५ लाख लोकसंख्येमागे एक रेडिओथेरेपी युनिट असणे आवश्यक आहे. त्यात नागपूरच्या मेडिकलवर विदर्भासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या रुग्णांचा भार वाढत आहे. मेडिकलमध्ये एकच तेही जुनाट कोबाल्ट युनिट असल्याने रु ग्णांना दोन महिन्यांच्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे. सध्या पुरु षांमध्ये कॅन्सरच्या प्रमाणाचे दर १० हजार लोकसंख्येमागे ८१ तर स्त्रियांमध्ये ८६ इतके आहे. याची दखल घेत तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी २०१३ मध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि ‘सर्जरी कॅन्सर केअर’ला मंजुरी दिली. कॅन्सर रु ग्णलयासंबंधी २०१२ मध्ये ४२९ कोटींचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर केंद्रीय मंत्रालयाने देशपातळीवर एक धोरणात्मक निर्णय घेऊन देशातल्या २० राज्यांमध्ये कॅन्सर इन्स्टिट्युट आणि ४९ ‘सर्जरी कॅन्सर केअर’ स्थापन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्या आधारे नागपूरच्या मेडिकलला आणि साताराच्या जिल्हा रुग्णालयाला प्रत्येकी एक ‘सर्जरी कॅन्सर केअर’ सेंटर मिळाले. यासाठी ४५ कोटी मिळणार आहेत. यात केंद्राचा ७५ टक्के तर राज्य शासनाचा २५ टक्के वाटा राहणार आहे. दरम्यानच्या काळात सत्ता परिवर्तन झाल्याने ही योजना थंडबस्त्यात पडली होती. परंतु आता पुन्हा या योजनेला वेग आला आहे. टीबी वॉर्ड येथील चार एकरची जागाही पाहण्यात आल्याची माहिती आहे. या योजनेमुळे कॅन्सर पीडितांच्या वेदना काही अंशी का होईना कमी होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)