नागपूर : नागपूर शहर तसेच विदर्भातून मध्य प्रदेशातील इंदूर प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. परंतु कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून इंदूर बससेवा बंद होती. शनिवारपासून नागपुरातून मध्य प्रदेशातील इंदूरला बससेवा सुरू करण्यात येत आहे. गणेशपेठ बसस्थानकावरून नागपूर-इंदूर बस सकाळी ५.१५ वाजता सुटणार असून ही बस इंदूरला सायंकाळी ७.४० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात इंदूर-नागपूर बस इंदूरवरून सकाळी ५.३० वाजता सुटून सायंकाळी ७.५५ वाजता नागपूरला पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांसाठी सुविधा झाली असून या बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
..............