शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत

By admin | Updated: March 3, 2017 02:55 IST

महापालिकेने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड(व्हीएनआयएल) यांची सेवा खंडित करून ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत

विद्यार्थी व प्रवासी त्रस्त : २३७ पैकी १६० बसेस रस्त्यांवर नागपूर : महापालिकेने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड(व्हीएनआयएल) यांची सेवा खंडित करून ‘आपली बस’ या प्रकल्पांतर्गत १ मार्चपासून शहरातील बससेवा सुरू केली आहे. परंतु सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी शहरातील बस वाहतूक विस्कळीत होती. परीक्षा सुरू असतानाच शहरातील बसफेऱ्या कमी झाल्याने याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.व्हीएनआयएलची सेवा खंडित केल्यानंतर नवीन तीन आॅपरटरने शहरातील वाहतुकीची जबाबदारी स्वीकारली आहे. जुन्या आॅपरेटरची सेवा खंडित केल्याचा शहरातील वाहतुकीवर फारसा परिणाम होणार नाही. पहिल्या दिवशी १८० बसेस धावतील असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु २३७ बसेसपैकी पहिल्या दिवशी १३५ बसेस शहरातील रस्त्यांवर धावत होत्या तर दुसऱ्या दिवशी ही संख्या १६० पर्यंत पोहचली. मार्गावरील बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे हाल झाले. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांना बसची प्रतीक्षा करावी लागली. ज्या मार्गावर स्टार बसशिवाय पर्याय नाही, अशा मार्गावरील प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. मोरभवन व महाराजबाग आदी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. पिपळा, हिंगणा, कामठी व पारडी आदी बसस्थानकावर प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागली. आपली बस प्रकल्पांतर्गत चालक व वाहकांची जबाबदारी चौथ्या आॅपरेटरवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी व्हीएनआयएलच्या २०८ वाहकांना सेवेत घेण्यास नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. तर आरोप असलेल्या वाहकांना सेवेत न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)