शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बंटी, बबली निर्दोष

By admin | Updated: August 19, 2015 03:05 IST

बंटी आणि बबली या नावांनी कुप्रसिद्ध झालेल्या तरुण आणि तरुणीची एका तरुणाला आत्महत्या करण्यास ...

तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा होता आरोपनागपूर : बंटी आणि बबली या नावांनी कुप्रसिद्ध झालेल्या तरुण आणि तरुणीची एका तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. मोंटी ऊर्फ शुभम जयस्वाल (२०) आणि गुडिया ऊर्फ एव्हेनजेलिना ठाणेकर (१९), अशी आरोपींची नावे असून ते तुमसर भागातील रहिवासी आहेत. कैलास परिहार, असे मृताचे नाव होते. तो बजेरियाचा रहिवासी होता. सरकार पक्षानुसार प्रकरण असे की, मोंटी आणि गुडिया हे दोघेही बहीण-भावासारखे राहत होते आणि नियमितपणे मुख्य रेल्वस्थानकासमोरील पांडे यांच्या हॉटेलमध्ये जेवण करायचे. नेहमीचे ग्राहक म्हणून त्यांची हॉटेलची स्वयंपाकी महिला जानकी परिहारसोबत ओळख झाली होती. एक दिवस मोंटीने जानकीला गुडियाचे लग्न करायचे आहे, एखादा मुलगा पहा, असे म्हटले होते. जानकीने आपल्याच एका मुलाचे लग्न करावयाचे आहे, असे त्यांना सांगितले होते. पुढे सोयरिक जुळून १७ जुलै २०१३ रोजी जानकीने आपला मुलगा कैलास याचे लग्न गुडियासोबत करून दिले होते. १८ रोजी थाटात स्वागतसमारंभ होऊन त्याच रात्री गुडिया आणि मोंटी हे दागिने, रोख आणि कपड्यांसह पसार झाले. या घटनेचा जबर मानसिक धक्का बसून कैलासने २१ जुलै २०१३ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी २७ जुलै २०१३ रोजी गुन्हा दाखल करून त्याच दिवशी दोघांनाही अटक केली होती. या प्रकरणाचा तपास होऊन आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, कैलासने आत्महत्या करावी, असा आरोपींचा उद्देश नव्हता. १८ जुलैच्या रात्री कैलासने दारूच्या नशेत गुडियाला जबर मारहाण केली होती. त्यामुळे ती मोंटीसह पळून गेली होती. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य ठरवून संशयाचा फायदा देऊन त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चेतन ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पिंपळगावकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)