शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019; मध्यमवर्गाला अधिक दिलासा मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:19 IST

१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपुरातील युवा राजकीय व आर्थिक विश्लेषक शिवानी दाणी-वखरे यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत.

ठळक मुद्देयंदाचं हे बजेट पूर्ण बजेट असणार आहे. ते अंतरिम नसेल.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्षा बाशूनागपूर:सोळाव्या लोकसभेची मुदत ३१ जानेवारी २०१९ ला संपत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१९-२० साठी सरकारकडून १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी व्होट ऑन अकाऊंट म्हणजेच अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागपुरातील युवा राजकीय व आर्थिक विश्लेषक शिवानी दाणी-वखरे यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो लोकमतच्या वाचकांसाठी देत आहोत.१ तारखेला सादर केला जाणारा अंतरिम अर्थसंकल्प कसा असू शकतो?शिवानी दाणी वखरे- २०१९ च्या बजेटकडे सगळ््या लोकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण हे निवडणूकपूर्व बजेट असल्याने त्याच्याकडे जनतेचं लक्ष अधिक राहणार आहे. लोकांमध्ये उत्सुकता आहे. याला पॉलिटिक्स बजेट असंही संबोधलं जाऊ शकतं. अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता, ज्या प्रकारे आपण आतापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा भांडवली खर्च केला आहे, हा तो खर्च असतो ज्यात संपत्ती निर्माण केली जाते. जसं पूल बांधणं, रस्ते बांधणं. ज्यातून सरकाराल रेव्हेन्यू मिळतो. दुसरा असतो रेव्हेन्यू किंवा महसूल खर्च. हा खर्च करावाच लागतो. जसं सेवानिवृत्ती वेतन. आतापर्यंतच्या बहुतांश अर्थसंकल्पांमध्ये या महसूल खर्चावर फार मोठा भर दिला जात होता. त्या तुलनेत भांडवली खर्चाकडे लक्ष दिलं जात नव्हतं. मात्र गेल्या तीन-चार वर्षांत भांडवली खर्चावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे हे आपण पाहत आहोत. भांडवली व महसूलीमधलं हे प्रमाण आता सकारात्मक झाले आहे. त्यामुळे या बजेटमध्ये भांडवली खर्चाला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.दुसरं म्हणजे, या बजेटमध्ये सबसिडीसाठी काय तरतुदी आहेत यावरही लक्ष राहणार आहे. गेल्या चार वर्षात सबसिडीचे प्रकार बदलवले गेले आहेत. आता ती शेवटच्या माणसापर्यंत पोहचली जाते. त्याची क्वालिटी सुधारली आहे. या सबसिडीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.ज्याला देशाचा कणा असं आपण म्हणतो, त्या नोकरदार व मध्यमवर्गासाठी या बजेटमध्ये प्राप्तिकराची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता आहे. सध्या ती एक लाख पन्नास हजारांची आहे. तीत वाढ होऊ शकते. त्यामुळे मध्यमवर्गही मोठ्या अपेक्षेने या बजेटवर नजर ठेवून आहे.यंदाचं हे बजेट पूर्ण बजेट असणार आहे. ते अंतरिम नसेल.या बजेटमध्ये जेडीपीचे प्रमाण राखले जाते की नाही याकडेही लक्ष दिले जाईल. कृषी आणि युवा वर्गासाठी याआधी विशेषत्वाने विचार केला गेला नव्हता. जो आता केला जातो आहे. त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत ते पाहणंही औत्सुक्याचे राहील. एकंदरित हे एक पूर्ण बजेट असेल. 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019