शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धगया मुक्तीचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत

By admin | Updated: August 29, 2016 02:48 IST

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही.

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा संकल्प नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी लढा देत असलेले भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा हा सुरू राहील, तो आपला प्रण आहे असा पुनरुच्चार रविवारी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे ३० आॅगस्ट रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त इंदोरा येथील बुद्ध विहारात अनेकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भदंत ससाई यांनी या लढ्याची पार्श्वभूमी सांगितली. ई.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात. मात्र, या महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. यासाठी आपण १९९२ पासून आंदोलन सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. १९४९ चा कायदा रद्द करून विहाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण बौद्धांना सोपविण्यात यावे, याकरिता १९९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान केंद सरकारतर्फे वाटाघाटी सुरू होत्या. सरकारच्या विनंतीवरून ही याचिका मागे घेतली. दरम्यान केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून पुन्हा याचिका दाखल केली. १९९२ पासून आतापर्यंत १८ टप्प्यात हे आंदोलन सुरू आहे. सर्वच पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला. परंतु आजही महबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बोधगया मुक्तीचा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार भदंत ससाई यांनी यावेळी केला. शांती आणि करुणेच्या मार्गानेच हा लढा सुरू राहील. बाबासाहेबांनी दिलेले संविधान या लढ्याला कायद्याचे बळ देईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)