शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलिसांना अटक

By admin | Updated: August 27, 2016 02:33 IST

ट्रकमध्ये दारू असल्याची बतावणी करीत कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या

भिवापुरात ‘एसीबी’ची कारवाई ’: दीड लाख रुपयांची मागितली लाचभिवापूर : ट्रकमध्ये दारू असल्याची बतावणी करीत कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. दोघांचीही भिवापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भिवापूर शहरात करण्यात आली.पोलीस हवालदार राजेश काशीराम माकडे (बकल नंबर ५७२) व पोलीस शिपाई ओम सहारे (बकल नंबर ११२३) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. फिर्यादी हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या वाहनात घरगुती साहित्य घेऊन शुक्रवारी पहाटे चंद्रपूरहून भिवापूरला आले होते. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या हवालदार राजेश माकडे व शिपाई ओम सहारे या दोघांनी त्यांचे वाहन पकडले. या वाहनात दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, अशी बजावणी करीत त्यांनी सदर वाहन ताब्यात घेतले. परंतु, गुन्हा दाखल केला नाही. या दोघांनीही ही कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीला १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीला ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लगेच नागपूर येथील ‘एसीबी’च्या कार्यालयात तक्रार नोंदविली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यात त्यांना तथ्य आढळून आल्याने भिवापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सायंकाळी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे फिर्यादीने राजेश माकडे याला १ लाख ५० हजार रुपये दिले. ही रक्कम स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर ओम सहारे यालाही अटक करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, दिनेश शेंडे, प्रभाकर बेले, राजेंद्र जाधव, अमोल फिस्के, दास यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)