शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागणारा हवालदार अटकेत

By admin | Updated: February 6, 2016 03:10 IST

कारवाईचा धाक दाखवून एका शेतकऱ्याला ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले.

वाहतूक शाखेचा पोलीस :  ५०० रुपयांसाठी भवितव्य धोक्यातनागपूर : कारवाईचा धाक दाखवून एका शेतकऱ्याला ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. संजय श्रीधरराव शिंदे असे आरोपीचे नाव आहे. तो पश्चिम विभागाच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. कोतुर्णी येथील संजय नेवारे १ फेब्रुवारीला नागपूरहून पारशिवनीकडे जात होते. कोराडी नाक्यावर त्यांना तपासणीच्या नावाखाली पोलीस हवलदार शिंदेने थांबवले. दारू पिऊन असल्याचा आरोप करीत वाहनाची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर कारवाई न करण्याच्या बदल्यात ५०० रुपयांची लाच मागितली. त्यावेळी पैसे नाहीत, असे म्हटले असता ५०० रुपये आणून कागदपत्रे घेऊन जा, असे शिंदे म्हणाला. नेवारेने या प्रकाराची तक्रार एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे केली. त्यावरून शहानिशा केल्यानंतर २ फेब्रुवारीला सापळा लावण्यात आला. (प्रतिनिधी)संशय आल्याने टाळाटाळनेवारे स्वत:च रक्कम देण्यासाठी उत्साह दाखवत असल्याने शिंदेला संशय आला. त्यामुळे त्याने २ फेब्रुवारीपासून लाच घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, तत्पूर्वी त्याने लाच मागितल्याचा पुरावा असल्यामुळे आज शिंदेविरुद्ध कोराडी ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार, मोनाली चौधरी, मनोज गभने, शिपाई शंकर कांबळे, राजेंद्र जाधव यांनी ही कामगिरी केली.