शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक

By admin | Updated: May 28, 2017 02:29 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी

आदेश जारी : उन्नत शेतीने रोखला मार्ग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी यंदा जाहीर केलेले ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी ’अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लावण्यात आला आहे. यासंबंधी राज्य शासनातर्फे अलीकडेच एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशानुसार मे महिन्यात बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून राज्यात ‘उन्नत शेती-समृद्घ शेतकरी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत कृषी विभागामार्फत शेती विकास आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजना, कार्यक्रम, आधुनिक कृषी औजारे तसेच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सोबतच या मोहिमेत प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता आणि त्या पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेची तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घेणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे अपेक्षित आहे. अशास्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास ही मोहीम राबविण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवक या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी विशेष म्हणजे, मागील वर्षीसुद्धा उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शिवाय यंदा पुन्हा सरकारने बदल्यांना ब्रेक लावल्यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी थांबविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आता एकाच ठिकाणी चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, तर त्यांना पाचवे वर्षसुद्धा काढावे लागणार आहे. मागील वर्षी कृषी खात्यात अचानक झालेल्या फेरबदलामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखण्यात आल्या होत्या. शिवाय यावर्षी उन्नत शेतीने पुन्हा या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग रोखला आहे.