शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गंगाजमुनात पोलिसांची धाडसी कारवाई

By admin | Updated: March 22, 2017 02:43 IST

पोलिसांकडून वेळोवेळी छुटपुट कारवाई होऊनही गंगाजमुनातील वेश्याव्यवसायावर परिणाम होत नसल्याचे पाहून पोलीस उपायुक्त संभाजी कदम

९१ वारांगना, ४६ ग्राहकांना अटक : कारवाईसाठी स्वत:च शिरले एसीपी, डीसीपी नागपूर : पोलिसांकडून वेळोवेळी छुटपुट कारवाई होऊनही गंगाजमुनातील वेश्याव्यवसायावर परिणाम होत नसल्याचे पाहून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी रिना जनबंधू यांनी आज स्वत:च मोठा पोलीस ताफा घेऊन गंगाजमुनात धडक दिली. येथे त्यांनी तब्बल ९१ वारांगना आणि ४६ ग्राहकांना ताब्यात घेतले. या धाडसी कारवाईमुळे ‘रेडलाईट’ परिसरात आज दुपारी प्रचंड खळबळ उडाली. रेडलाईट एरिया म्हणून कुपरिचित असलेल्या गंगाजमुनात गेल्या अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय चालतो. येथे काही वारांगना स्वमर्जीने वेश्याव्यवसाय करतात तर, काहींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो. वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिला-पुरुष दलालांचे लकडगंज ठाण्यात सलोख्याचे संबंध आहेत. या पापाच्या कमाईचा मोठा हिस्सा पोलिसांना मिळतो. त्यामुळे वेळोवेळी पोलिसांकडून कारवाईचा बनाव केला जातो. अलीकडे दलालांकडून वारांगनांना पुढे करून ग्राहकांना धाक दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहे. बलात्काराचा आरोप लावून मोठी रक्कम, दागिने हिसकावून घेण्याचेही प्रकार वाढले आहे. त्याची माहिती कानावर आल्यापासून पोलीस उपायुक्त (डीसीपी) संभाजी कदम आणि सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) रिना जनबंधू यांनी धडक कारवाईची योजना बनविली. ठरल्याप्रमाणे पोलीस ठाण्यातील मंडळींना वेळेपर्यंत याबाबतची माहिती देण्याचे डीसीपी, एसीपींनी टाळले. त्यानंतर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास एसीपी रिना जनबंधू यांनी पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, लकडगंजचे सहायक निरीक्षक डी. डी. निळे, आर. जी. राजुलवार, महिला सहायक निरीक्षक ए. जी. वानखेडे यांच्यासह ६० पोलिसांचा ताफा घेऊन गंगाजमुनात धडक दिली. तेथून ९१ वारांगना आणि ४६ ग्राहकांना पकडण्यात आले. (प्रतिनिधी) १० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच या अनपेक्षित कारवाईमुळे गंगाजमुनात एकच धावपळ निर्माण झाली. अनेक ग्राहक नको त्या अवस्थेत पळत सुटले. काहींनी पोलिसांच्या तावडीतून अशा प्रकारे पळ काढण्यात यश मिळवले. मात्र, ४६ ग्राहक पोलिसांच्या हातात सापडले. या सर्वांवर लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरच्या अलीकडच्या १० वर्षाच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात वारांगना आणि ग्राहकांवर पोलिसांनी केलेली ही पहिलीच धडाकेबाज कारवाई ठरली. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर व्यक्तींनी डीसीपी कदम आणि एसीपी जनबंधू यांचे व्यक्तीश: अभिनंदन केले.