- रामनारायण मिश्र : सरयूपारिण ब्राह्मण महासभेतर्फे सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्राह्मण समाजाने संघटन करून समाजसेवेचा आदर्श घालावा आणि शक्ती प्रदर्शनाने आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचववाव्या, असे आवाहन अखिल विश्व सरयुपारिण ब्राह्मण महासभा नागपूरचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रामनारायण मिश्र यांनी केले.
सिव्हिल लाईन्स येथील जवाहर विद्यार्थी सभागृहात महासभेद्वारे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, आ. दुष्यंत चतुर्वेदी, महासभेचे कार्याध्यक्ष ओमप्रकाश मिश्र, कोषाध्यक्ष रवींद्रकुमार पाण्डेय, रत्नेश्वर तिवारी, प्रेमशंकर चौबे, नरेंद्र मिश्रा, अजय त्रिपाठी, नितीन तिवारी, केशवकांत तिवारी, अशोक पांडे उपस्थित होते. याप्रसंगी दयाशंकत तिवारी, अमितेश कुमार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच डॉ. सागर मदन पाण्डे, डॉ. विपिन बावरा, शारदा प्रसाद मिश्रा, त्रिलोकनाथ सिध्रा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय गायक सोमनाथ मिश्रा आणि संध्या मिश्रा यांच्या संगीतसंध्येचे आयोजन झाले. संचालन महेश तिवारी यांनी केले.
दयाशंकर तिवारी, अमितेश कुमार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा सत्कार करताना रामनारायण मिश्र व अन्य.