शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मेयोतील दोन्ही एक्स-रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) दोन्ही एक्स-रे यंत्र आठवड्यापासून बंद पडल्याने विशेषत: गंभीर आजाराचे ...

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) दोन्ही एक्स-रे यंत्र आठवड्यापासून बंद पडल्याने विशेषत: गंभीर आजाराचे रुग्ण अडचणीत आले आहेत. रुग्णांना पदरमोड करून बाहेरून खासगी केंद्रातून एक्स-रे करावे लागत आहे. रुग्णालय प्रशासन यंत्र दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत असले तरी मोठा बिघाड असल्याने यंत्र सुरू होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताच ‘नॉन कोविड’च्या रुग्णांत वाढ झाली आहे. सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये आर्थाेपेडीक्स, ईएनटी, नेत्र व सर्जिकल विभाग सुरू झाले आहे. मेडिसीन विभागातही रुग्ण वाढत चालले आहे. परंतु आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेले एक्स-रे सारखे यंत्र बंद पडल्याने रुग्णसेवेला याचा फटका बसत आहे. मेयोमध्ये दोन एक्स-रे यंत्र आहेत. यातील एक यंत्र महिन्याभरापूर्वीच बंद पडले. यामुळे एकाच मशीनवर रुग्णांचा भार होता. यातच गर्दी वाढल्याने रुग्णाला दुखणे सहन करीत दोन-तीन तास रांगेत उभे रहावे लागत होते. याच दरम्यान बुधवारी दुसरे यंत्रही बंद पडले. प्राप्त माहितीनुसार, महिन्याभरापासून बंद असलेल्या एक्स-रे मशीनच्या देखभाल व दुरुस्तीचे पैसे मागील दोन वर्षांपासून थकीत आहेत. यामुळे हे यंत्रच दुरुस्त झाले नाही. नुकतेच बंद पडलेल्या यंत्राचा एक मोठा पार्ट निकामी झाला आहे. संबंधित कंपनीला याची माहिती दिली असली तरी दुरुस्तीसाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी दोन्ही यंत्र बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, लवकरच यातील एक यंत्र सुरू होईल. नव्या एक्स-रे यंत्राचा प्रस्ताव नसल्याचेही ते म्हणाले.