शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघांना अटक

By admin | Updated: October 31, 2015 03:19 IST

स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथील टुर्सच्या नावे बजाजनगर येथील विदर्भ कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स वेल्फेअर असोसिएशनची ..

विदेश सहलीच्या नावे २२.७० लाखांनी फसवले : ६ पर्यंत पीसीआरनागपूर : स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथील टुर्सच्या नावे बजाजनगर येथील विदर्भ कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स वेल्फेअर असोसिएशनची २२ लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी इंदूर येथील एनटीएच ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीसह दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांनाही मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. ढुमणे यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. ट्रॅव्हल्स कंपनीची मालकीण निखिला गुप्ता आणि विवेक साहू, अशी आरोपींची नावे आहेत. या असोसिएशनचे माजी सचिव विनोद नरोत्तमसिंग वर्मा यांच्या तक्रारीवरून २७ आॅक्टोबर २०१५ रोजी अंबाझरी पोलिसांनी या दोघांविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची हकिकत अशी की, असोसिएशनचे विनोद वर्मा यांच्यासह २४ सदस्य स्वित्झर्लंड, जर्मनी आणि पॅरिस येथे स्वखर्चाने एकत्रित पैसे जमवून पर्यटनासाठी जाण्यास इच्छूक असल्याने इंदूरच्या या एनटीएच ट्रॅव्हल्स कंपनीकडून कोटेशन मागविण्यात आले होते. सदस्यांनी प्रती व्यक्ती ९४ हजार ५५० रुपये या खर्चाला मान्यता दिली होती. २२ ते २८ जुलै २०१५ पर्यंत या टुर्सचे आयोजन करण्यात आले होते. १२ जून ते २० जुलैपर्यंत या कंपनीच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात २२ लाख ७० हजार रुपये आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे स्थानांतरित करण्यात आले होते. उर्वरित रक्कम टुर्स पूर्ण झाल्यावर दिली जाणार होती.अन् टाळाटाळ सुरू केली२२ जुलैच्या टुर्ससाठी सर्व सदस्य तयारीत गुंतले असतानाच अचानक ११ जुलै रोजी ट्रॅव्हल्स कंपनीचा विवेक साहू याने असोसिएशनला ई-मेल करून काही सदस्यांचे व्हिसा संदर्भातील कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कळवले होते. लागलीच या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. २० जुलै रोजी ट्रॅव्हल्सची मालकीण निखिला गुप्ता हिने विनोद वर्मा यांना फोन करून सांगितले की, नागपूरच्या धर्मादाय आयुक्तांनी सर्व सदस्यांचे व्हिसा रोखून धरले आहे. ते असोसिएशनच्या रजिस्ट्रेशनबाबत विचारणा करीत आहेत. ती माहितीही या ट्रॅव्हल्सकडे पाठविण्यात आली होती. पुन्हा निखिलाने फोन करून सांगितले की, दूतावासाने टुर्सबाबत शपथपत्रे मागितली आहेत. त्यामुळे ही टुर्स एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. ट्रॅव्हल्सने पुन्हा अडचणी निर्माण करून २४ हजार रुपयांचा भरणा करण्यास लावले. १९ आॅगस्ट २०१५ रोजी सदस्यांना व्हिसा मिळाला असता त्यांनी युरो करन्सी खरेदी करण्यासाठी विमानाच्या तिकिटांची मागणी केली होती. निखिलाने त्यांना एमिरेटस् फ्लाईटची तिकिटे पाठविली होती. मात्र या तिकिटांवर मंजुरीची तारीख आणि पीएनआर क्रमांक नव्हते. पुन्हा २१ आॅगस्ट रोजी निखिलाने असोसिएशनला सूचना दिली की, एमिरेटस एअरलाईनने आमच्या तिकीट बुकिंग रद्द केल्या आहेत. याबाबत असोसिएशनने चौकशी केली असता साहू आणि निखिलाने एमिरेटस दुबईला पैसेच दिले नव्हते. त्यामुळे बुकिंग रद्द करण्यात आले होते. असोसिएशनने जुलै २०१५ पर्यंत या ट्रॅव्हल्सला संपूर्ण पैसे दिले होते. असोसिएशनने आपले पैसे परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली. पुढे परतफेड म्हणून या ट्रॅव्हल्सने असोसिएशनला तीन चेक दिले होते. त्यापैकी प्रारंभीचे दोन चेक वटविण्यासाठी बँकेत जमा करण्यात आले असता ते बाऊन्स झाले. एकूणच या ट्रॅव्हल्सकडून असोसिएशनची फसवणूक करण्यात आली. शुक्रवारी अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिंगारे यांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. सरकार पक्षातर्फे या गंभीर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोपींच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील ए. पी. सिंग, फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. अतुल पांडे तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. पीयूष शुक्ला आणि अ‍ॅड. राजेश शाहू यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)