शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीने जाळून घेतले, दोघांचाही मृत्यू

By admin | Updated: March 11, 2017 02:38 IST

रोज रोज होणाऱ्या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले.

नागपूर : रोज रोज होणाऱ्या वादाचा भडका उडाल्यामुळे एकमेकांच्या रागावर पती-पत्नीने जाळून घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दर्शना (वय ३१) आणि सोनू लक्ष्मणराव नितनवरे (वय ३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. शेजाऱ्यांची वेळीच मदत मिळाल्यामुळे त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा बचावला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. कोराडीच्या सेक्टर २९ मधील श्रीकृष्ण धाम, वॉक्स कूलर परिसरात राहणाऱ्या सोनूचे घरीच छोटेसे किराणा दुकान होते. घरी गाई आणि शेळ्याही होत्या. पत्नी दर्शना किराणा दुकान सांभाळायची तर सोनू दुधाचा व्यवसाय करायचा. घरची स्थिती चांगली असूनही सोनू दिवसभर कष्ट करायचा. मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. रोजच त्याला दारू प्यायला लागत होती. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर पती-पत्नीत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सोनूने शेळ्या चरायला सोडल्या. त्याच्या घराच्या बाजूलाच रेल्वेलाईन आहे. रेल्वे रुळावरून जात असलेल्या एका शेळीला रेल्वेगाडीने चिरडले. ते पाहून सोनू दुखावला. त्या अवस्थेत त्याने दुपारीच दारू घेतली. त्यावरून पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. रात्री रागाच्या भरात सोनूने पुन्हा दारू घेतली अन् त्यानंतर पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. रोज रोज होणारी कटकट संपविण्यासाठी सोनूने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. छोटेसे घर अन् कपड्यापासून सारेच सामान घरात असल्याने घरातील साहित्य पेटले. सोनूला वाचविण्याच्या प्रयत्नात दर्शनाच्या अंगावरील कपड्यानेही पेट घेतला अन् काही वेळेतच दोघांचाही कोळसा झाला. सर्वांग पेटल्यामुळे दर्शना आणि सोनू जिवाच्या आकांताने किंकाळू लागले. ते ऐकून बाजूलाच झोपलेला त्यांचा नऊ वर्षीय शौर्य नामक मुलगा जागा झाला. त्याने आतून लावून असलेली दाराची कडी उघडली अन् जळणाऱ्या आई वडिलांवर बादलीतील पाणी फेकून त्यांना विझविण्याचे प्रयत्न केले. आरडाओरड ऐकून शेजारी राहणारे पृथ्वीराज सोपान पाटील यांनी धाव घेतली. त्यांनीही दर्शना आणि सोनूला विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. घरही जळाले होते. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून कोराडीच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता तराळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावल्या. त्यांनी नितनवरे दाम्पत्याला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. गुरुवारी सकाळपर्यंत नितनवरे दाम्पत्याचे घर हसते खेळते होते. नवरा बायको अन् मुलगा असे छोटे मात्र सुखी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे शेजारी बघत होते. मात्र, दोघांच्याही अविवेकीपणामुळे या घराची राखरांगोळी झाली. आई वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने शौर्य पोरका झाला.(प्रतिनिधी)