शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

By admin | Updated: October 30, 2015 02:59 IST

उमरेड येथील होमिओपॅथी डॉक्टर अरविंद पंडित यांच्या राधे स्पेशालिटी क्लिनिकचे स्टिंग आॅपरेशन करून...

हायकोर्ट : उमरेड येथील ब्लॅकमेल प्रकरणनागपूर : उमरेड येथील होमिओपॅथी डॉक्टर अरविंद पंडित यांच्या राधे स्पेशालिटी क्लिनिकचे स्टिंग आॅपरेशन करून पाच लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. व्ही.एम. देशपांडे यांच्या एकलपीठाने दोन आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उमरेड पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला नोटीस जारी करून १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे. त्याच दिवशी दोन्ही आरोपींचा तात्पुरता अटकपूर्व जामीन कायम होण्यावर सुनावणी होणार आहे. अजय बद्रीनारायण सोनी आणि विवेक वसंतराव तातेकर रा. रेशीमबाग, अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सोनी फार्मसी टाइम्सचा संपादक तर तातेकर हा होलसेल औषध विक्रेता आहे. डॉ. अरविंद पंडित यांच्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींविरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी उमरेड पोलीस ठाण्यात भादंविच्या ३८४, ५०१, ५०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हा तात्पुरता अटकपूर्व जामीन प्राप्त केला. उच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. योगेश मंडपे तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पी. व्ही. भोयर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)पोलीस करीत आहेत दिशाभूल उमरेड पोलीस हे आमच्या संदर्भात जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अजय सोनी याने केला. डॉ. अरविंद पंडित हे होमिओपॅथी डॉक्टर असून स्वत:ला बालरोगतज्ज्ञ असल्याचे सांगतात. ते इतर तीन बड्या डॉक्टरांच्या नावांचा गैरफायदा घेत आहेत. जनतेची होत असलेली फसवणूक चव्हाट्यावर आणण्यासाठी आपण खुद्द कल्याणी वाघ यांच्यासोबत रुग्ण बनून ८ जून रोजी पंडित यांच्या इस्पितळात गेलो होतो. तेथील चित्र अत्यंत भयावह होते. दुसऱ्याच दिवशी आपण अन्न व औषध प्रशासनाकडे चित्रीकरणासह या क्लिनिकची तक्रार केली होती. प्रकरण दाबण्यासाठी खुद्द डॉ. पंडित यांनी विवेक तातेकर यांच्याशी संपर्क साधला होता. तातेकर यांनी कधीही पैशासाठी पंडित यांच्याशी संपर्क साधला नाही. पोलिसांनी आपल्याबाबत इंटरनेटवरून माहिती गोळा करून न्यायालयात दाखल केली. बऱ्याच गुन्ह्यांशी आपला संबंध नाही, असेही सोनी याने सांगितले.