शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठिसुळ हाडांना ‘बोन बँक‌‌’ देणार मजबुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

सुमेध वाघमारे नागपूर : हाडाचा कर्करोग, संसर्ग किंवा अपघातात हाडाचे मोठे नुकसान होते. भारतात दरवर्षी हजारो रुग्णांना हाडाच्या प्रत्यारोपणाची ...

सुमेध वाघमारे

नागपूर : हाडाचा कर्करोग, संसर्ग किंवा अपघातात हाडाचे मोठे नुकसान होते. भारतात दरवर्षी हजारो रुग्णांना हाडाच्या प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु जवळपास केवळ ३५ टक्के लोकांनाच ती उपलब्ध होऊ शकतात. रुग्णांच्या अडचणी व विदर्भात कर्करोगाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘बोन बँक’ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे हाडाच्या जीवघेण्या प्रतीक्षेत असणाऱ्याचे आयुष्य लवकरच सुकर होणार आहे.

एखाद्या अपघातानंतर, दुर्घटनेनंतर अनेकांची हाडे तुटतात. काहींची हाडे कर्करोग अथवा ट्युमरसारख्या दुर्धर आजारामुळे क्षीण होतात. बोन बँकेच्या माध्यमातून अशा रुग्णांमध्ये दुसरी हाडे बसविता येतात. परंतु मध्य भारतात ‘बोन बँक’ नाही. गरजू रुग्णांना मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, दिल्लीतील एम्स, एएमसी चेन्नई, कोईम्बतूरमधील गंगा हॉस्पिटलमधील बोन बँकेतून (अस्थी पेढी) मदत घ्यावी लागते. परंतु हाडदानाविषयी फारशी जनजागृती नसल्याने ‘ब्रेन डेड’ व्यक्तींच्या नातेवाईकांकडून ती होत नाही. अनेकदा देहदान होऊनही ‘बोन बँक’ नसल्यामुळे हाडे जतन करण्याची व्यवस्थाच नाही. परिणामी, काहींवर दिव्यांग जीवन जगण्याची वेळ येते. ही बाब समजूनच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी नव्या वर्षात ‘बोन बँक’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मित्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, जिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयाला मिळणाऱ्या १२ कोटी रुपयामधून या ‘बँके’साठी सुमारे १.५ कोटीचे नियोजन केले आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील ‘बोन बँक’चा आधार घेऊन ती तयार केली जाणार आहे. भारतात ओडिशाव्यतिरिक्त दिल्लीतील एम्स, एएमसी चेन्नई, कोईम्बतूरमधील गंगा हॉस्पिटल आणि मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बोन बँक सुविधा आहे. यामुळे मध्य भारतातील ही पहिली ‘बोन बँक ’ असणार आहे.

- बोन बँकअभावी कंबरेतील हाड काढण्याची वेळ येते

मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. मो. फैजल यांनी सांगितले, एखाद्या रुग्णाला हाडाची गरज पडल्यास त्याच्या कंबरेतील हाड काढले जाते. परंतु याला मर्यादा असतात. कमीतकमी हाड काढावे लागते. रुग्णावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतात. शिवाय, कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर शरीराला जी भोके पडतात ती भरून काढण्यासाठी दान केलेल्या हाडाचीच गरज पडते. यामुळे ‘बोन बँक’ आवश्यक आहे.

-ही हाडे काढली जातात

‘कॅडेव्हर’ किंवा देहदान झालेल्या मृतदेहाच्या शरीरातून कंबरेच्या खालील नितंब, पेल्विस, मांड्या आणि गुडघे आदी भागातील १० हाडे काढली जातात. शरीरातून हाडे काढून त्याचे जतन करण्यासाठी उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात डीप फ्रीजरमध्ये ठेवली जातात. पाच वर्षांपर्यंत ती अशा पद्धतीने जतन केली जाऊ शकतात.

-एका मृतदेहातून हाडाच्या दानाने २० लोकांचे आयुष्य बदलते

एक मृतदेहातून दान केलेली हाडे जवळपास २० लोकांचे आयुष्य बदलू शकते. अवयव लोकांना नवे आयुष्य प्रदान करतात तर, हाड आणि पेशी त्रासदायक आयुष्य सुकर बनवू शकतात.

-हाडासाठी रुग्णांची जीवघेणा प्रतीक्षा संपणार

मेडिकलमध्ये मध्य भारतातून मोठ्या अपेक्षेने रुग्ण येतात. हाडाचा कर्करोग, अपघात, गुडघ्याचे सांधेबदल या शस्त्रक्रिया करताना ‘बोन बँके’ची नितांत गरज पडते. त्यांना पुन्हा चांगले आयुष्य जगण्यास मदत होते. यामुळेच ‘बोन बँके’चा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या बँकेतून गरीब रुग्णावर मोफत उपचार केले जातील.

-डॉ. सजल मित्रा

अधिष्ठाता, मेडिकल